CVIGIL App : मतदारांनो, तुमचा उमेदवार पैसे वाटतोय?? थेट मोबाईलवरूनच करू शकता थेट तक्रार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने काल पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखा जाहीर केल्या आहेत. देशात एकूण ७ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याची सुरुवात १९ एप्रिल पासून होईल आणि सातव्या टप्प्याचे मतदान १ जूनला होईल. यानंतर ४ जूनला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणूक निःपक्ष आणि पारदर्शकपणे व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली असून त्यासाठी जवळपास २७ अँप लाँच केली आहेत. यातील एक अँप म्हणजे CVIGIL App.. खरं तर कोणत्याही उमेदवाराच्या मनात धडकी भरवेल असच हे अँप आहे कारण या अँपवर सर्वसामान्य नागरिक थेट उमेदवाराची तक्रार करू शकतात.

निवडणुकीचं काळात पैसे वाटप, चुकीच्या माहितीचा प्रचार, आचारसंहितेचा भंग, मतदानावर प्रभाव टाकणे, मतदारावर दबाव टाकणे अशाप्रकारच्या घटना घडत असतात, त्यामुळे या गोष्टींवर आळा घालण्यासाठी निवडणूक आयोग शर्थीचे प्रयत्न करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आयोगाकडून CVIGIL App लाँच करण्यात आलं आहे. मतदान केंद्रावर कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळ्यास किंवा काही हेराफेरी दिसली तर मतदार त्याबाबतचे फोटो काढून CVIGIL App वरून तक्रार करू शकतो. या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी १०० मिनिटाच्या आत सदर ठिकाणी पोचतील.

यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे या ॲपवर तक्रार करणाऱ्यांचे नाव आणि पत्ता गोपनीय ठेवण्यात येणार आहे. तक्रारदाराच्या सुरक्षेबाबत आयोगाने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय तक्रारदाराबाबत कोणी काही सांगितल्यास त्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे अगदी बिनदास्त पणे मतदार तक्रार नोंदवू शकतात. आणि निःपक्ष आणि पारदर्शक निवडणूकसाठी निवडणूक आयोगाला हातभार लावू शकता.

CVIGIL App कसे काम करते?

सर्वात आधी तुमच्या मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोअर वरून CVIGIL App डाउनलोड कारण लागेल.
या ॲपद्वारे मतदार आणि नागरिक निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याच्या तक्रारी नोंदवू शकतात.
मतदारांना पैशाची लाच देणे, दारूच्या बाटल्या विकणे किंवा परवानगीपेक्षा जास्त वेळ लाऊडस्पीकर वाजवणे अशा काही गोष्टी तुमच्या निदर्शनास आल्यास तुम्ही त्याचे फोटो किंवा विडिओ रेकॉर्ड करून अपलोड करू शकता
निवडणूक आयोगाला तक्रारीयाबाबत माहिती मिळताच तात्काळ कारवाई सुरू होते.
100 मिनिटांच्या निवडणूक आयोगाचे अधिकारी सदर ठिकाणी पोचतील.