ओपिनियन पोलमध्ये दादांना भोपळा, शिंदेंना 5 जागा मिळण्याची शक्यता

AJIT PAWAR EKNATH SHINDE
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election 2024) साठी सीव्होटर आणि एबीपी न्यूज यांनी (CVoter and ABP News Opinion Poll) घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये राज्यातील महायुतीला आणि हादरा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील एकूण ४८ मतदारसंघापैकी भाजप महायुतीला ३० जागा आणि महाविकास आघाडीला १८ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. महत्वाची बाब म्हणजे पक्षातून बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना जनता साफ नाकारेल असेही या सर्व्हेत दिसून येतंय. या ओपिनियन पोलनुसार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला अवघ्या ५ जागा मिळतील तर अजित पवारांना भोपळा मिळेल, त्यांची एकही जाग निवडून येण्याची शक्यता नाही. महायुतीच्या बाकी ७ ठिकाणी उमेदवार जाहीर नाही तिथे मात्र कोणीही उभं केलं तरी निवडून येईल. म्हणजेच एकूण ३० जागा महायुतीच्या खात्यात जातील. तर दुसरीकडे ठाकरे आणि शरद पवार जोरदार कमबॅक करतील असा अंदाज आहे.

सीव्होटर आणि एबीपी न्यूजच्या सर्वेनुसार, महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ९ आणि शरद पवार गटाला ६ आणि काँग्रेसला ३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एकूणचे काय तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने दुसर्यांना दिले असले तरी जनतेचं प्रेम मात्र त्यांना अजूनही मिळताना दिसत आहे. उद्धव ठाकरेंना खास करून जनतेची मोठी सहानभूती मिळताना दिसत आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे, मध्यांत धैर्यशील मोहिते आणि साताऱ्यात शशिकांत शिंदे आघाडीवर दिसत आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील आपली ताकद पवारांनी कायम ठेवल्याचे पाहायला मिळत आहे.

सीव्होटर आणि एबीपी ओपिनियन पोलचा अंदाज काय सांगतोय –
रामटेक – राजू पारवे (शिंदे-शिवसेना)- चुरशीची लढत
नागपूर – नितीन गडकरी (भाजप)- सोपा विजय
वर्धा – रामदास तडस (भाजप) – चुरस
अमरावती – नवनीत राणा (भाजप)- सोपा विजय
अकोला – अनुप धोत्रे (भाजप) – सोपा विजय
बुलढाणा – नरेंद्र खेडेकर (ठाकरे-शिवसेना) कांटे की टक्कर
भंडारा गोंदिया – सुनील मेंढे (भाजप) – कांटे की टक्कर
गडचिरोली चिमुर – नामदेव किरसान (काँग्रेस)- चुरशीची लढत
चंद्रपूर – सुधीर मुगंटीवार (भाजप) – कांटे की टक्कर
यवतमाळ वाशिम – संजय देशमुख (ठाकरे-शिवसेना) चुरशीची लढत
हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर (ठाकरे-शिवसेना) चुरशीची लढत
नांदेड – वसंतराव चव्हाण (काँग्रेस) कांटे की टक्कर
परभणी – संजय जाधव (ठाकरे-शिवसेना) सोपा विजय
जालना – रावसाहेब दानवे (भाजप) सोपा विजय
संभाजीनगर – चंद्रकांत खैरे (ठाकरे-शिवसेना) कांटे की टक्कर
बीड – पंकजा मुंडे (भाजप) – चुरशीची लढत
धाराशिव – ओमराजे निंबाळकर (ठाकरे-शिवसेना) – सोपा विजय
लातूर – सुधाकर शृंगारे (भाजप)- सोपा विजय
नंदुरबार – गोवाल पाडवी (काँग्रेस) – कांटे की टक्कर
धुळे – सुभाष भामरे (भाजप) – कांटे की टक्कर
जळगाव – स्मिता वाघ (भाजप) – सोपा विजय
रावेर – रक्षा खडसे (भाजप) – सोपा विजय
दिंडोरी – भरती पवार (भाजप)
नाशिक – महायुती (उमेदवार घोषित नाही)
अहमदनगर – निलेश लंके (शरद पवार राष्ट्रवादी)
शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे-शिवसेना)
पुणे – मुरलीधर मोहोळ (भाजप) – सोपा विजय
बारामती – सुप्रिया सुळे (शरद पवार राष्ट्रवादी) चुरशीची लढत
शिरूर – अमोल कोल्हे (शरद पवार राष्ट्रवादी) सोपा विजय
मावळ – श्रीरंग बारणे (शिंदे-शिवसेना) – सोपा विजय
सोलापूर – राम सातपुते (भाजप) – कांटे की टक्कर
माढा – धैर्यशील मोहिते पाटील (शरद पवार राष्ट्रवादी)- सोपा विजय
सांगली – संजयकाका पाटील (भाजप) – कांटे की टक्कर
सातारा – शशिकांत शिंदे (शरद पवार राष्ट्रवादी) – कांटे की टक्कर
कोल्हापूर – संजय मंडलिक (शिंदे-शिवसेना) – चुरशीची लढत
हातकणंगले – सत्यजित पाटील (ठाकरे-शिवसेना) – चुरशीची लढत
पालघर – महायुती (उमेदवार घोषित नाही) – सोपा विजय
भिवंडी – सुरेश बाळ्यामामा म्हात्रे (शरद पवार राष्ट्रवादी) – चुरशीची लढत
कल्याण – श्रीकांत शिंदे (शिंदे-शिवसेना) – सोपा विजय
ठाणे – महायुती (उमेदवार घोषित नाही) – चुरशीची लढत
उत्तर मुंबई – पियूष गोयल (भाजप) – सोपा विजय
उत्तर पश्चिम मुंबई – महायुती (उमेदवार घोषित नाही) – सोपा विजय
उत्तर पूर्व (ईशान्य) मुंबई – मिहिर कोटेचा (भाजप) – कांटे की टक्कर
उत्तर मध्य मुंबई – महायुती (उमेदवार घोषित नाही) – सोपा विजय
दक्षिण मध्य – राहुल शेवाळे (शिंदे-शिवसेना) – सोपा विजय
दक्षिण मुंबई – महायुती (उमेदवार घोषित नाही)- कांटे की टक्कर
रायगड – अनंत गीते (ठाकरे-शिवसेना) – चुरशीची लढत
रत्नागिरी सिंधुदुर्ग – महायुती (उमेदवार घोषित नाही) – सोपा विजय