Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातमध्ये धडकणार; 74 हजार नागरिकांचे स्थलांतर, NDRF पथके तैनात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अरबी समुद्रात निर्माण झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. आज सायंकाळी ४ नंतर हे चक्रीवादळ कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदराला धडकण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर असून आत्तापर्यंत 74000 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलंय. तसेच खबरदारी म्हणून NDRF ची 33 पथके तैनात करण्यात आली आहेत.

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात तयार झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ ज्यावेळी गुजरात किनारपट्टीवर धडकेल त्यावेळी त्याचा वेग ताशी 125 ते 135 किमी पर्यंत असू शकते. त्यामुळे किनारपट्टीला मोठा फटका बसू शकतो. या वादळाच्या पार्श्वभूमीवर कच्छमध्ये 34,300 लोकांचे इतर ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय. तसेच जामनगरमध्ये 10 हजार, गीर सोमनाथ जिल्ह्यात 1605 , द्वारकामध्ये 5035  मोरबीमध्ये 9243  राजकोटमध्ये 6079  जुनागढमध्ये 4604 , पोरबंदर जिल्ह्यात 3469  लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या अनेक भागात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. काही रेलेवं गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच किनारपट्टीच्या भागात शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. तसेच लाखो मच्छीमाराना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.