Saturday, March 25, 2023

महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी CYDA चा पुढाकार, रोजगाराच्या नवीन संधींसाठी व्हा तयार..!!

- Advertisement -

पुणे प्रतिनिधी | पुण्यातील सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज (CYDA) या संस्थेतर्फे महिलांना सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. ८ दिवस ते ३ महिने एवढ्या कालावधीत चालणारी ८ प्रशिक्षण सत्रे CYDA तर्फे आयोजित करण्यात आली आहेत. केवळ महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये इलेक्ट्रिशियन, मोटारसायकल दुरुस्ती, पेंटर, डिलिव्हरी असिस्टंट, पेट्रोलपंप असिस्टंट, मोबाईल रिपेअरिंग, ड्रायव्हिंग आणि एलईडी दिवे बनवणे यांचा समावेश आहे.

या प्रशिक्षणातून शिकून बाहेर पडलेल्या मुलींना, महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची किंवा चांगल्या ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड ऍक्टिव्हिटीज तर्फे तरुण आणि महिलांना केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रमांचं आयोजन वर्षभर करण्यात येतं.

- Advertisement -

WhatsApp Image 2020-01-23 at 2.12.01 PM

दरम्यान महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी 9762472553, 9657996964 या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन CYDA तर्फे करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा- 

साई जन्मभूमीचा वाद आता उच्च न्यायालयात जाणार

रुक्मिणी मातेच्या ८ हजार साड्यांची अल्प दरात विक्री; साडी विक्रीतून मंदिर समितीला २० लाखांचे उत्पन्न

बाळासाहेबांचा कोणता नातू महाराष्ट्राचं राजकारण गाजवणार? जयंतीदिनी अमित आणि आदित्य ठाकरेंचं शक्तिप्रदर्शन