मनोहर जोशी यांना डी.लिट पदवी प्रदान..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

डी.वाय.पाटील विद्यापीठातर्फे बुधवारी मुंबईत देण्यात आलं सन्मानपत्र

मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी यांचा बुधवारी सन्मान करण्यात आला. मनोहर जोशी यांना डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे ‘डी. लिट’ या पदवी प्रदान करण्यात आली आहे. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी जोशी यांची मुंबईत स्वतः भेट घेऊन ही पदवी सुपूर्द केली आहे.

राजकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी डी. लिट ही पदवी दिली जाते.डॉ. मनोहर जोशींनीही सामाजिक कार्यात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच मनोहर जोशींचा या पदवीनं सन्मान करण्यात आला आहे.

“जीवनात मी शिक्षणाला खूप महत्त्व दिले, त्याची या विद्यापीठाने दखल घेतल्याबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो; तसेच डी. वाय. पाटील यांच्यासारख्या शिक्षणसम्राटांच्या हस्ते ही पदवी प्रदान होणं हे माझं भाग्य आहे.” या शब्दांत डॉ. जोशी यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. पदवीप्रदान प्रसंगी डी. वाय. पाटील विद्यापीठाचे उपकुलपती डॉ. शिरीष पाटील व डॉ. जोशी यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Leave a Comment