डी.पी. भोसले कोरेगाव महाविद्यालयात सांस्कृतिक व गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात साजरा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । डी. पी. भोसले कोरेगाव महाविद्यालयात आज ट्रॅडिशनल डे आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमधील कला गुणांना वाव मिळावा म्हणून विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात समूहागित, मुकनाट्य, लघुनाटीका, एकांकिका, भरतनाट्यम, लोकनृत्य आदी कलाप्रकार सादर करण्यात आले. यावेळी ग्रामीण मुलांचे अभिनयकौशल्य, सादरीकरण आणि व्यासपीठीवरील सहज सुलभ वावर वाखाणण्याजोगे होते.

Untitled design (14)

या तरुण मुलांनी सादरीकरणासाठी निवडलेले विषयामधून त्यांचे समाजभान दर्शवत होते. समूहागीतांमध्ये देशभक्तीपर आणि लोकगीत सादर करण्यात आले. मुकनाट्यमध्ये दिव्यांग मुले ही ऑलिम्पिक मध्ये पदक कसे मिळवतात आणि स्वतःमधील कमतरतांवर मात कशी करतात हे दाखविण्यात आले. दुसरे मुकनाट्य हे आज मोबाईल चा वाढत वापर कसा हानिकारक आहे यावर भाष्य करणारे होते. लघुनाटिका कलाप्रकारामध्ये नवरा वारलेला असताना त्याचे दुःख न वाटता बायको मात्र टिक-टॉकवर आपला सवाष्ण असल्याचा शेवटचा व्हिडीओ अपलोड करण्यात मग्न हे दाखवून आजच्या बदललेल्या मानसिकतेवर भाष्य केले आहे. दुसऱ्या लघुनाटिकेमधून आजकाल मेडिकल प्रोफेशन मधील अपप्रवृत्तीवर प्रकाशझोत टाकला.

Untitled design (15)

मैत्री या विषयावरील आणि ऊसतोड कामगारांच्या आयुष्यावर आधारित एकांकिकानी प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणले. भरतनाट्यम आणि लोकनृत्य सादरीकरण हे लक्षवेधक आकर्षण ठरले. हे सर्व कार्यक्रम विदयार्थी आणि विद्यार्थ्यांनी स्वतः बसवलेले होते. याची कल्पना ते सादरीकरण सगळे विद्यार्थ्यांनी केले होते ही विशेष उल्लेखनीय बाब अच्युतआठवे या अकरावीच्या विद्यार्थ्याने ऊसतोडणी कामगारांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणाऱ्या एकांकिकेचे लेखन आणि मध्यवर्ती भूमिका करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Untitled design (16)

या कर्यक्रमासाठी प्राचार्य डॉ विजय सिंह सावंत यांनी विशेष मार्गदर्शन केले. सांस्कृतिक समिती प्रमुख प्रा.सचिन निकम व प्रा.नलिनी ढाणे यांनी या पूर्ण कार्यक्रमाचे संयोजन केले तर सूत्रसंचालन प्रा. एस व्ही. वीरकर , प्रा. व्ही.व्ही भोसले, प्रा. प्रतिज्ञा जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे उदघाटन प्रसिद्ध लेखिका प्राची अष्टपुत्रे-हरदास यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या प्रसंगी डॉ सुनील जाधव, उपप्राचार्य, प्रा. डॉ मनिषा आनंद पाटील, वैशाली पाटील, प्राजक्ता कुलकर्णी, कविता देवकर, डी. पी. भोसले महाविद्यालयाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Untitled design (17)

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

Leave a Comment