DA Hike 2025| सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने अखेर आज 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली आहे. यासंदर्भातील प्रक्रियेला 16 जानेवारी 2025 पासून सुरुवात होणार आहे. नव्या वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू होतील. यासोबतच महागाई भत्ता (DA) आणि सेवा निवृत्तीधारकांना मिळणारा महागाई दिलासा(DR) वाढवण्याचा निर्णय सरकार लवकरच घेणार आहे.
कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोग आणि महागाई भत्ता हे दोन्ही महत्त्वाचे विषय आहेत. सध्या केंद्रीय कॅबिनेटमध्ये DA वाढीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास 2025 च्या जानेवारीपासून नवीन DA लागू होऊ शकतो. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्यातील पगारात वाढ होईल आणि त्यांना दोन महिन्यांचे थकबाकीचे पैसे (DA Arrears) देखील मिळतील.
महागाई भत्त्यात सर्वात कमी वाढीची शक्यता
गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार होळीच्या सुमारास DA वाढीची घोषणा करत असते. मात्र यंदा कर्मचाऱ्यांसाठी फारशी दिलासादायक बातमी नाही. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) आकडेवारीनुसार DA फक्त 2% (DA Hike 2025) वाढण्याची शक्यता आहे. ही वाढ गेल्या सात वर्षांतील सर्वात कमी वाढ असणार आहे. महत्वाचे म्हणजे, जुलै 2018 पासून आजपर्यंत सरकारने किमान 3% ते 4% वाढ दिली आहे. मात्र यंदा केवळ 2% वाढ होण्याची शक्यता असल्याने कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांना मोठा धक्का बसू शकतो.
AICPI निर्देशांकानुसार DA वाढीचे गणित
महागाई भत्ता वर्षातून दोन वेळा म्हणजेच जानेवारी आणि जुलै महिन्यात निश्चित केला जातो. त्यासाठी सरकार अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI-IW) चा आधार घेते. या आकडेवारीचे विश्लेषण करून मागील सहा महिन्यांच्या डेटानुसार DA वाढीचा दर (DA Hike 2025) निश्चित केला जातो. मात्र मागील काही वर्षांपासून सरकार DA वाढीची घोषणा उशिरा करत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
78 महिन्यांतील सर्वात कमी वाढ
दरम्यान, यंदा जर DA फक्त 2% ने वाढला, तर हा जुलै 2018 नंतरचा सर्वात कमी वाढीचा टप्पा असेल. याआधी 2018 मध्येही फक्त 2% वाढ झाली होती. त्यामुळे महागाईच्या झळा सोसत असलेल्या कर्मचाऱ्यांना यंदा फारसा दिलासा मिळणार नाही. आता केंद्र सरकार DA वाढीबाबत काय अंतिम निर्णय घेते, याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.