डब्बू रतनानी यांचे कॅलेंडर झाले लॉन्च, ही बॉलिवूड अभिनेत्री मस्त स्टाईलमध्ये पोज देताना दिसली… पाहा फोटो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर डब्बू रत्नानी आपल्या फोटोग्राफीबरोबरच कॅलेंडरसाठीही प्रसिद्ध आहे. डब्बू रत्नानी यांनी २०२० चे कॅलेंडरही बाजारात आणले आहे. ज्याचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री शर्लिन चोप्रा आपल्या जबरदस्त स्टाईलमध्ये फोटोशूट करत आहे, त्याचवेळी भूमी पेडणेकरचा कॅलेंडर फोटोही चर्चा रंगवीत आहे आणि सेलिब्रिटींची ही शैली पाहून त्यांचे चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.


View this post on Instagram

At the Dabboo Ratnani Calendar Launch.. Thanks Dabboo & Manisha ji for the love & warmth ???? #dabbooratnanicalendar

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on Feb 17, 2020 at 11:21am PST

 

अभिनेत्री शर्लिन चोप्राने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या कॅलेंडर लाँच दरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शर्लिन चोप्रा मस्त पोज देताना दिसत आहे. “डब्बू रत्नानीच्या कॅलेंडर लाँचिंगच्या वेळी डब्बूजी आणि मनीषा जी यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद.” अशा आशयाचा कॅप्शन या अभिनेत्रीने व्हिडिओ वर ठेवला आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.

याशिवाय अभिनेत्री भूमि पेडणेकर हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कॅलेंडरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये भूमी बाथ टबमध्ये दिसत आहे. भूमी पेडणेकरांचा हा न्यूड फोटो सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगवीत आहे.नुकतच अभिनेत्री भूमी पेडणेकर हिला तिच्या ‘सँड की आँख’ या चित्रपटासाठी समीक्षकांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे.


View this post on Instagram

 

2020 Calendar time ???? @manishadratnani @dabbooratnani #dabbooratnanicalendar ????????????

A post shared by Kriti (@kritisanon) on Feb 18, 2020 at 12:23am PST

 

 

Leave a Comment