सातारा जिल्हा भाजपा किसान मोर्चा उपाध्यक्ष पदी दादा धायगुडे तर चिटणीस पदी कोंडिबा उंब्रटकर यांची निवड

लोणंद प्रतिनिधी । सुशिल गायकवाड

वाघोशी ता.खंडाळा येथील दादा धायगुडे यांची भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी तर चिटणीस पदी दापकेघर येथील कोंडीबा उंब्रटकर यांची निवड करण्यात आलेली आहे.ही निवड भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रामदास शिंदे, तसेच जिल्हा सचिव देविदास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली आहे.

या निवडी वेळी भाजप जिल्हा सरचिटणीस शेखर वडणे, सचिन घाडगे, जिल्हा सचिव देविदास चव्हाण, खंडाळा तालुका सरचिटणीस विकास ननावरे तसेच भाजपचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.या निवडीबद्दल भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी व भाजप पदाधिकाऱ्यांनी दोघांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.

दरम्यान , निवडी नंतर दादा धायगुडे व कोंडिबा उंब्रटकर यांनी पक्षासाठी एकनिष्ठ काम करीन व पक्ष वाढीसाठी मदत करेन असा विश्वास दर्शविलेला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like