टीम HELLO महाराष्ट्र | मराठी सिनेसृष्टीत आपल्या विनोदी कलेमुळे आणि अडल्ट जाॅक्समुळे प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या दादा कोंडकेंची आज जयंती. कोणासाठी सोंगाड्या तर कोणासाठी पांडू हवालदार असणार्या दादा कोंडक्यांचं हाफ बर्मुडा आणि खाली लोंबत असलेली नाडीतलं रुप आजही कित्तेकांना हसायला भाग पाडतं. अशा या दादा कोंडकेंच्या या गोष्टी तुम्हाला माहीती ऄहेत का?
१. माझी इच्छा पूर्ण करा या मराठी नाटकातून दादा कोंडकेंनी अभिनयाला सुरवात केली. १९६५ मधे सुरु झालेले हे नाटक समाजवादी विचाराचे वसंत सबनिस यांनी लिहिले होते. दादा कोंडके यांनी ‘माझी इच्छा पुर्ण करा” या नाटकाचे तब्बल १,१८५ शो केले होते. सदर नाटकात तमाशा या लोककलेच्या आधारे लोकांच्या प्रश्नांवर टिपण्णी करण्यात आली होती.
२. १९७५ साली दादा कोंडके यांचा “पांडु हवालदार” हा चित्रपट प्रदर्शीत झाला. हा चित्रपट इतका लोकप्रिय झाला की त्यानंतर काही वर्ष महाराष्ट्रात पोलीसांना पांडू हवालदार असेच म्हणून संबोधण्यात येऊ लागले.
३. दादा कोंडके तमाशातील कलाकार असून कलात्मक चित्रपटांमधे काम करण्याची त्यांची क्षमता नसल्याचे बोलून त्यावेळचे अभिनेते कोंडकेंवर चिडून असायचे. परंतू दादा कोंडकेंनी कलेवरील आस्थेच्या अधारावर सिनेसृष्टीत आपले वजन कायम ठेवले. जब्बार पटेल यांच्याबद्दल दादा कोंडकेंनी असेच विधान केले होते.
४. १९७१ साली प्रदर्शीत झालेला दादा कोंडकेंचा “सोंगाड्या” चित्रपट विशेष गाजला. यामधे तमाशात काम करणार्या एका नृत्यंगणाच्या प्रेमात बुडालेल्या युवकाची कहाणी सांगण्यात आली आहे.