Dagdusheth Ganesh Mandal Look : यंदा दगडूशेठ गणेश मंडळाचा देखावा कसा असणार? ट्रस्टने केली मोठी घोषणा

Dagdusheth Ganesh Mandal Look
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Dagdusheth Ganesh Mandal Look । गणेशोत्सव म्हणजे भारतीयांचा सर्वात मोठा सण.. या काळात आपल्या घरात, मंडळात गणपतीची मूर्ती बसून त्याची मनोभावे पूजा केली जाते… महाराष्ट्रातील गणपतीच्या आराध्य मंदिरापैकी एक म्हणजे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर… दररोज भाविकांनी खचाखच भरलेल्या या मंदिरात गणेशोत्सव काळातही मोठी उत्सुकता असते. दगडूशेठ गणेश मंडळाचा देखावा कसा असणार याकडे सर्वांचं लक्ष्य असत. आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने यंदाच्या देखाव्याबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, यंदा दगडूशेठ गणेश मंडळाच्या देखाव्याला श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. आज या थीमचा शुभारंभ सोहळा पार पडला.

पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीत 5 थरांचा गोपुर असणार Dagdusheth Ganesh Mandal Look-

सजावट विभागात आयोजित या शुभारंभ सोहळ्याला कलादिग्दर्शक विनायक रासकर आणि सरिता रासकर यांच्या हस्ते सुरुवात झाली. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याने गणेशोत्सवाच्या तयारीला अधिकच गती मिळाली आहे. गेली अनेक वर्षे विविध मंदिरांची उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरीता ट्रस्ट प्रयत्नशील राहिले आहे. यंदा हा मान श्री पद्मनाभ स्वामी मंदिराला मिळाला आहे. पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीत (Dagdusheth Ganesh Mandal Look) 5 थरांचा गोपुर असणार आहे. त्यामध्ये कृष्णलीला, रामायण, सप्तऋषी, घोडे, हत्ती, सिंह साकारण्यात येणार आहेत. तर, गाभाऱ्यात विष्णू लक्ष्मी, शिवपार्वती, श्रीकृष्ण आणि नृसिंह यांच्या मूर्ती असणार आहे. मुख्य मखराच्या वरच्या बाजूस अष्टकोनी भागामध्ये भगवान पद्मनाभ स्वामींची भव्य निद्रिस्त मूर्ती साकारण्यात येणार आहे. सजावटीचे काम आता जोमाने सुरू झाले असून, यंदा भाविकांना एक भव्य आणि अविस्मरणीय दर्शनाचा अनुभव मिळणार आहे.

दरम्यान, पद्मनाभस्वामी मंदिर हे भारताच्या केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) शहरातील ईस्ट फोर्ट परिसरात असलेले एक प्राचीन आणि प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भगवान विष्णू यांना समर्पित असून, त्यांची “अनंत शयनम” (शेषनागावर शयन करणारी) मुद्रा येथे पूजली जाते. मंदिराचा जीर्णोद्धार 18व्या शतकात त्रावणकोर राजघराण्याचे राजा मार्तंड वर्मा यांनी केला. मंदिराची मुख्य मूर्ती 12008 शालिग्राम शिळांनी बनलेली असून, ती 18 फूट लांबीची आहे