गणेशोत्सव स्पेशल : इतिहास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र | भक्तांचे श्रद्धास्थान असलेला तसेच, केवळ भारतच नव्हे तर जगभरात ख्याती पावलेला गणपती म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती. हा गणपती भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा प्रसिद्ध गणपती आहे. या गणपतीला अनेक शतकांची परंपरा लाभलेली आहे. त्याच्या स्थापनेपासून ते आजवरच्या प्रवासापर्यंतचा एक इतिहास आहे. या गणपतीच्या मंदीरापासून ते मुर्तीपर्यंत स्वत:चा म्हणून असा एक प्रवास आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण या गणपतीचा इतिहास जाणून घेऊया.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या काळात या गणपतीची प्रतिष्ठापणा झाली. बाबुराव नाईक या प्रसिद्ध मुर्तीकाराने १८९३ साली या गणपतीची पहिली मूर्ती बनवली. लोकमान्य टिळकांनी या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली. पहिल्यांदाच विराजमान झालेल्या दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीची बाबूरावांना बिदागी मिळाली होती अवघी २२ रुपये. पहिल्या मुर्तीचे वैशिष्ट्य असे की, ही मूर्ती रांध्यापासून तसेच गुळाची ढेप व कागदाचा लगदा यापासून ही मूर्ती बनविण्यात आली. तसेच, या मूर्तीच्या पोटात विधिवत गणेश यंत्र बसविण्यात आले आहे. आजही ही मूर्ती अकरा मारुती चौक येथील राम मंदिरात असून, तिची नित्य नेमाने पूजा केली जाते.

सन १८९६ साली बनवलेल्या मुर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती. त्यामुळे सन १९६७ साली आपल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त तत्कालीन सुवर्णयुग तरूण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणपतीची नवीन मुर्तीं बनविण्याचा संकल्प केला व त्यासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार शिल्पी यांना पाचारण केले. त्यांच्याकडून लहान मातीची मूर्ती नमुना म्हणून करून घेतली. बाळासाहेब परांजपे यांनी कार्यकर्त्यांना ती मूर्ती प्रोजेक्टरवरून मोठया पडद्यावर दाखविली व सर्वानुमते ती आधीच्या मूर्तीसारखी असल्याची खात्री पटल्यानंतर मोठया मूर्तींचे काम प्रत्यक्षात सुरू झाले.

मूर्ती पूर्ण तयार झाल्यानंतर शिल्पी यांनी त्यावेळी जे ग्रहण झाले त्या दिवशी संगम घाटावर ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली. गणेश यंत्राची पूजा केली व त्यानंतर ज्या ठिकाणी मातीची मूर्ती तयार केली होती. त्याच ठिकाणी येऊन विधिवत धार्मिक गणेश याग केला, व त्यानंतर ते सिद्ध श्रीयंत्र मंगलमूर्तीच्या पोटामध्ये सर्वांसमक्ष ठेवले. शिल्पी यांनी जमलेल्या लोकांना या मंगलमूर्तीची तुम्ही सर्वांनी दररोज नित्य नियमाने पूजा करा व त्याचे शेवटपर्यंत पावित्र्य राखा असे सांगितले. तेव्हापासून ते आजतागायत या गणपतीची रोज पूजा केली जाते आणि आता हा एक श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जातो.

हे पण वाचा –

गणेश मंडळांसाठी खुशखबर! सवलतीच्या दरात मिळणार वीज

गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांसाठी खुशखबर

सार्वजनिक गणेशोत्सव कसा सुरु झाला…? जाणून घ्या

बाप्पाला नैवेद्य म्हणून ‘या’ सोप्या पद्धतीने बनवा ‘उकडीचे मोदक’

लोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव …

गणेशोत्सवाच्या धर्तीवर बाजारपेठा सजल्या ; साहित्य खरेदीसाठी गणेश भक्तांची झुंबड

कोल्हापूरकरांचे ठरले, यंदाचा गणेशोत्सव साधेपणानेच

Leave a Comment