खाऊगल्ली | पोळी-भाजी सोबत तोंडी लावायला दही-मिरची हा उत्तम पर्याय आहे. दही-मिरची हा प्रकार जरा आंबट, गोड्सर, खारट आणि तिखट असा असल्याने तो मस्त लागतो. ज्या लोकांना तिखट खायला आवडते मात्र तिखट खाल्ल्याने त्रास होतो अशा लोकांसाठी हा पदार्थ योग्य ठरू शकतो, कारण मिरच्या तळल्यामुळे त्यांचा तिखटपणा कमी होतो.
साहित्य –
१) एक वाटी दही
२) ७/८ हिरव्या मिरच्या
३) मीठ
४) साखर
५) जिरे पूड
६) चमचाभर तेल
७) कोथिंबीर
कृती –
सर्व मिरच्या मधून चिरून घ्या त्यातील बी कडून घ्यावे.
एका कढईत चमचाभर तेल तापवावे त्यात मिरच्या घालून मंद आचेवर मस्त कुरकुरीत तळून घ्याव्या.
मिरच्या तळेपरेंत दही थोडं फेटून घ्यावं. त्यात चवीनुसार मीठ, साखर, जिरे पूड घालावे.
आता कुरकुरीत तळलेल्या मिरच्या दह्याच्या मिश्रणात घालाव्या आणि वरून थोडी कोथिंबीर घालावी.
फार घट्ट असेल तर अगदी थोडं पाणी घालून थोडे पातळ करावे.
( टीप- दही गार असेल तर दही-मिरची मस्त लागते. )