पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग ७व्या दिवशी वाढ; जाणून घ्या आजचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. भारतीय तेल कंपन्यांनी मागील ७ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सतत वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या सततच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनतेच्या खिश्याला कात्री बसत आहे. दरम्यान कच्च्या तेलाच्या किंमतीत दिवसागणिक घट होत असताना देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे.

शनिवारी राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ७५ रूपये प्रती लिटरवर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये शिवराज सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर प्रत्येकी एक-एक रूपये अतिरिक्त कर लावला आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात ५९ ते ६० पैशांनी वाढ झाली असून डिझेलच्या दरात ५० ते ६० पैशांची वाढ झाली आहे. गेल्या ६ महिन्यांपासून पेट्रोलच्या दरात ३.९० रूपये प्रती लिटर तर डिझेल ४ रूपये प्रती लिटरने वाढ झाली आहे.

दिल्लीत पेट्रोलचे आजचे दर ७५ रूपये प्रती लिटर आहे. तर डिझेल ७३.३९ रूपये प्रती लिटरनुसार मिळत आहे. मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर अन्य शहरांच्या तुलनेत जास्त आहे. मुंबईत पेट्रोलचे आजचे दर ८२.१० रूपये प्रती लिटर आहे. तर डिझेल ७२.०३ रूपये प्रती लिटरनुसार मिळत आहे. चेन्नई आणि कोलकातामध्ये पेट्रोलचे दर क्रमशः ७८.९९रूपये आणि ७७.०५ प्रती लिटर आहे. डिझेलचे दर क्रमशः ७१.६४ रूपये आणि ६९.२३ रूपये प्रती लिटर आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment