धर्म परिवर्तन करणाऱ्या दलितांना राजकीय आरक्षण मिळणार नाही – कायदा मंत्री रविशंकर प्रसाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनुसूचित जातीतील व्यक्तींनी धर्मपरिवर्तन करून इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये प्रवेश केल्यास, ते आरक्षित जागेवरून निवडणूक लढवू शकणार नाहीत. तसेच असे लोक अनुसूचित जातीसाठी मिळणाऱ्या आरक्षणाचाही फायदा उठवू शकणार नाहीत. धर्मपरिवर्तन केलेल्या अनुसूचित जातीतील व्यक्तींना राजकीय आरक्षणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला राज्यसभेत केंद्रीय कायदा मंत्र्यान्नी उत्तर दिले.

सोबतच, अनुसूचित जातीतील दलित बांधव जे हिंदू आणि बौद्ध धर्माला मानतात ते आरक्षित जागेवरून निवडणूक लढवू शकतात. आणि आरक्षणाचा फायदाही घेऊ शकतात. राज्यसभेमध्ये बीजेपी खासदार जीबीएल नरसिंह राव यांनी ‘आरक्षित निवडणूक क्षेत्राची पात्रता’ यावर प्रश्न विचारला होता. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी संबंधित माहिती दिली. सोबतच ते म्हणाले की, संविधानामध्ये अनुसूचित जातीबद्दल पॅरा-3 ही विविध राज्यातील अनुसूचित जातीतील यादी सांगते. या अंतर्गत एखादा व्यक्ती हिंदू, शीख आणि बौद्ध धर्म व्यतिरिक्त धर्म मानत असेल आणि तो अनुसूचित जातीचा सदस्य असेल तर त्याला अनुसूचित जातीच्या सदस्य मांनला जाणार नाही. अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र असणारी कोणतीही व्यक्ती आरक्षित जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी पात्र आहे. असेही ते यावेळी म्हणाले.

राज्यसभेमध्ये भाजपचे खासदार जीबीएल नरसिंहराव यांनी सरकारला हे सुद्धा विचारले की, सरकार प्रतिनिधी कायदा आणि निवडणूक नियमावली वरती काही संशोधन करण्याच्या विचाराधीन आहे का? ज्यामध्ये ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मामध्ये धर्मपरिवर्तन केलेल्या दलित अनुसूचित जातीतील व्यक्तीला आरक्षित जागेवरून निवडणूक लढवता येणार नाही. यावर सरकारने उत्तर देताना, ‘असा कोणताही प्रस्ताव अद्याप सरकारच्या विचाराधीन नाही’ असे म्हटले आहे.

Leave a Comment