औरंगाबाद: राज्यात कोरोनाचे संकट काहीसे कमी झाले आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे आता निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. दुकाने तसेच आस्थापना सुरु ठेवण्याची वेळ वाढवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता खासगी शिकवण्या सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. त्यासाठी आज (10 जून) औरंगाबादेत आंदोलन करण्यात आले. यावेळी खासगी शिवकण्यांचे चालक, मालक आणि शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
औरंगाबादेत क्रांती चौक येथे आंदोलन…
कोरोनाची दुसरी लाट सरली आहे. रुग्ण कमी झाले आहेत. त्यामुळे राज्याचे अर्थकारण पूर्वपदावर येत आहे. या पार्श्वभूमीवर खासगी कोचिंग क्लासेस ( खासगी शिकवण्या) सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी आज औरंगाबादमधील क्रांती चौक येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी काळे कपडे तसेच काळे मास्क घालून आंदोलन केले. मागील एका वर्षापासून सर्व खासगी शिकवण्या बंद आहेत. त्यामुळे आतातरी या शिकवण्या सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी या आंदोलकांनी केली.
वर्षभरापासून कोचिंग क्लासेस बंद…
मागील काही महिन्यांपासून राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला होता. रोज हजारो नव्या रुग्णांची नोंद होत होती. तर कित्येक रुग्णांचा योग्य उपचाराअभावी मृत्यू होत होता. याच कारणामुळे राज्य सरकारने संपूर्ण राज्यभर कोरोना प्रतिबंधक नियम लागू केले होते. आता निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, असे असले तरी राज्यातील सर्व महाविद्यालये तसेच शाळा अजूनही बंदच आहेत. त्यामुळे कोचिंग क्लासेसही बंदच आहेत. मात्र, आता रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, औरंगाबादेत करण्यात आलेल्या आजच्या आंदोलनात विविध कोचिंग क्लासेसचे शेकडो मालक, चाकल तसेच शिक्षक उपस्थित होते. आंदोलकांनी यावेळी सरकारविरोधी घोषणा दिल्या. तसेच आपल्या मागण्यांचे फलक घेऊन आपला रोष व्यक्त केला.
https://www.facebook.com/aurangabadnewslive/videos/920848065360169/