अखेर मध्य प्रदेशातील धरण फुटले; प्रचंड वेगाने पाणी आजूबाजूंच्या गावामध्ये घुसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील करम नदीवर बांधलेले धरण अखेर फुटले (dam bursts). करम धरणातून जिथून गळती सुरु झाली होती, तेथील भिंत अखेर (dam bursts) फुटली. रविवारी सायंकाळी धरणाच्या सुमारे 25 फूट भिंतीचा काही भाग पाण्यात वाहून गेला त्यामुळे आजूबाजूंच्या गावामध्ये प्रचंड वेगाने पाणी घुसले.

18 गावे आधीच रिकामी करण्यात आली
धरण फुटण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता शिवराज सरकारच्या प्रशासकीय पथकांनी धरण वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले होते. भारतीय लष्कर आणि एनडीआरएफच्या तुकड्यांकडूनही मदत घेतली जात आहे. धरणाची स्थिती लक्षात घेता धोका टाळण्यासाठी धरण परिसरात येणारी 18 गावे या अगोदरच निकामी करण्यात आली होती.

बायपास कॅनल निर्माण करण्यात आला
धरण फुटण्याचा (dam bursts) धोका टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह एसीएस, एसीएस जलसंपदा आणि एसीएस होम हे भोपाळ कंट्रोल रूममधून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून होतो. अशा स्थितीत धरणाचे पाणी (dam bursts) वळते करण्यासाठी बायपास कॅनल निर्माण करण्यात आला. या कॅनलचे दोन दिवसांपासून अव्याहतपणे काम सुरू होते. परंतु, कडक खडकांमुळे ते काम पूर्ण होण्यास वेळ लागला.

धार जिल्ह्यातील 12 गावे आणि खरगोन जिल्ह्यातील 6 गावे रिकामी
धोका टाळण्यासाठी धार जिल्ह्यातील 12 गावे आणि खरगोन जिल्ह्यातील 6 गावे रिकामी करण्यात (dam bursts)आली. यावेळी लोकांना गावात थांबण्यास मनाई करण्यात आली. तसेच जनावरांनाही गावाबाहेर काढण्याचे निर्देश देण्यात आले. स्थलांतरित लोकांना प्रशासनाकडून प्रशासनकडून सर्वोतोपरी मदत करण्यात येत आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर