हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स हिंदीवरील ‘डान्स दिवाने’ या डान्सिंग रिऍलिटी शोचा सूत्रसंचालक आणि लोकप्रिय डान्सर राघव जुयाल मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा रसिकांचे भरघोस मनोरंजन करण्यासाठी परतला आहे. राघवच्या अनुपस्थितीत टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया हे दोघे कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून अव्वल भूमिका बजावत होते. कार्यक्रमापासून दूर असताना राघव कोरोना काळात त्याची जन्मभूमी उत्तराखंडमध्ये मदतीसाठी कार्यरत होता. कोविड रूग्णांसाठी ऑक्सिजन मिळण्याची व्यवस्था करण्यासोबतच आवश्यक औषधे खरेदी करण्यासाठी तो लोकांना मदत करत होता. त्याच्या याच कार्यासाठी त्याच्या परतीसोबत शोच्या टीमने त्याला सलाम ठोकला आहे.
https://www.instagram.com/tv/CP0MqQDhhkc/?utm_source=ig_web_copy_link
कार्यक्रमात बऱ्याच दिवसांनी त्याची एंट्री होणार होती. ती शो मेकर्सकडून खास करण्यात आली. पालखीमधून त्याने मंचावर एकदम ग्रँड एंट्री केली. मोठ्या जल्लोषात राघवचे भव्य असे स्वागत करण्यात आले. सर्व स्पर्धकांनी त्याच्यासाठी ‘घूमर’ गाण्यावर नृत्यदेखील सादर केले. यावेळी परीक्षक व स्पर्धकांनी राघवचे आभार मानले आणि लोकांना मदत करण्याच्या त्याच्या प्रयत्नांसाठी त्याला सलाम केला.
https://www.instagram.com/tv/CPz44APhywt/?utm_source=ig_web_copy_link
राघवने केलेल्या मदतकार्या बाबतचा व्हिडिओ पाहून परीक्षक माधुरी दिक्षितनेही त्याचे भरभरून कौतुक केले आहे. तिने म्हटले की, ”प्रत्येकजण विषाणूला घाबरून घरीच राहत असताना राघवने गावागावांमध्ये जाऊन गरजूंना मदत केली आहे. तो न घाबरता लोकांना मदत करत होता आणि स्वतःसोबत इतरांचीही काळजी घेत होता. तू केलेल्या या महान कार्यासाठी मी तुझे मनापासून आभार मानते. तुझ्या या कामगिरीसाठी मी तुला सलाम करते.”
https://www.instagram.com/p/CPf80fQBfBO/?utm_source=ig_web_copy_link
आपल्याबद्दल असे भरभरून प्रेम, कौतुक आणि अभिमानास्पद ऐकल्यानंतर राघव म्हणाला, ”मला सहाय्य करण्यासाठी सर्वांचे आभार. इतर कोणी असते तर मला परत येण्यास सांगितले असते, कारण मी या शोसोबत तस करारच केला होता.
https://www.instagram.com/tv/CPSVwDGhLtN/?utm_source=ig_web_copy_link
पण, येथे मला सर्वांनी प्रोत्साहित केले आणि मी करत असलेल्या कार्याला पाठिंबा दिला. मी कलर्स आणि ‘डान्स दिवाने’च्या संपूर्ण टीमचे त्यांच्या निरंतर पाठिंब्यासाठी आभार मानतो. डान्सरच्या ग्रुप्सनेही जागरूकता पसरवण्यामध्ये आणि योग्य संपर्क मिळण्यामध्ये मदत केली. माधुरी दीक्षित मॅमनेही कॉलवरून मला सर्वतोपरी मदत केली.” यासाठी सर्वांचे आभार.