मोनालिसाचा ‘गेंदा फूल’ गाण्यावर डान्स, हाॅट अंदाज पाहून चाहते दिवाने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन आहे. या वेळी सेलिब्रेटी आपला बराच वेळ सोशल मीडियावर घालवत असतात. कधी कोणी स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना दिसत आहे, तर कोणी घरात साफसफाईमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, मोनालिसाने तिचा एक डान्स व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, जो तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

मोनालिसाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती साडी घालून आणि बादशाहच्या गेंदा फुल या गाण्यावर ठुमके लागवताना दिसत आहे. यात मोनालिसाची मादक अदा पाहून कोणीही घायाळ होईल. तर हा व्हिडिओ अवघ्या काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

मोनालिसाने व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, “शेवटी झेंडूचे फूल.” मोनालिसाने तिच्या अनोख्या स्टाईलने सर्वांनाच आश्चर्यचकित करण्याची ही पहिली वेळ नाहीये. ती नेहमीच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांशी संवाद साधत राहते आणि तिचा एखाद दुसरा फोटो शेअर करून मनोरंजन करते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –

ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा – www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment