औरंगाबाद | पिण्याचे पाणी ड्रेनेज लाईनची सुविधा नसल्या कारणाने नागरिक त्रस्त. महापालिकेत समाविष्ट होऊन दहा वर्ष उलटली तरीही अद्याप सातारा परिसरातील रहिवाशांना ड्रेनेजच्या समस्याला सामोरे जावं लागत आहे. निवेदन देऊनही मनपा याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
ड्रेनज पाईपलाईनची सुविधा नसल्याने पावसाळ्यात तर अक्षरशः घरात पाणी साचते यामुळे घराच्या बाहेर निघणे ही अवघड झाले आहे, घरमध्ये महिला तसेच लहान मुलांनाही रोगराई होत आहे.
आणि यातूनच समस्या आणखीन वाढतच चालली आहे.
याच पार्शवभूमीवर सातारा परिसरातील नागरिकांनीच पुढाकार घेऊन मनपा ला निवेदन दिले आहे प्रवीण कुलकर्णी, महेश चौधरी,तुकाराम देशमुख, आंबादास तोतरे, धनंजय थोटे, आनंद कुलकर्णी, आंबादास गिते भुजबळ संध्या, आरती वडोदकर अशी मागणी यांनी केली तसेच यांच्यासह अनेकांचे नाव आहेत.