पाण्याची टाकी धोकादायक : तांबवे सारखी दुर्घटना करवडीमध्ये घडल्यावर प्रशासनाचे डोळे उघडणार का ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील मौजे करवडी गावाला पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी ही 35 वर्षा पूर्वीची असल्यामुळे पूर्ण जीर्ण झालेली असून धोकादायक बनली आहे. टाकीचे मुख्य पिलरचे सिमेंटचे ढपले कोसळत असून स्टील उघडे पडलेले आहे, टाकीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. याबाबत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने २०१५ साली टाकीचे तपासणी करून सदरची टाकी वापरण्यास धोकादायक असल्याचा अहवाल दिला आहे. तसेच सदरची टाकी पाडणे बाबत निर्लगांचा दाखला दिलेला आहे. तेव्हा करवडीतील धोकादायक पाण्याच्या टाकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, तांबवे सारखी दुर्घटना करवडीमध्ये घडल्यावर प्रशासनाचे डोळे उघडणार का ? असा सवाल पालकमंत्र्यांना निवेदनाद्वारे केला आहे.

निवेदनात असे म्हटले आहे की, माैजे करवडी गावची लोकसंख्या जवळपास 5 हजार इतकी आहे. गावातील मुख्य पाण्याची टाकी ही लोकवस्ती मध्ये असून बाजूलाच राम मंदिर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या टाकीच्या खाली लहान मुले खेळत असतात. तर ग्रामस्थ व जनावरांची ये- जा सुरू असते. तेव्हा टाकी कोसळल्यास मोठी जीवितहानी अथवा दुर्घटना होऊ शकते. कराड तालुक्यातील तांबवे गावात मध्यरात्री टाकी कोसळल्याने सातारा जिल्हा हादरला होता. यानंतरही करवडीतील धोकादायक पाण्याच्या टाकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तांबवे सारखी दुर्घटना करवडीमध्ये घडल्यावर प्रशासनाचे डोळे उघडणार का ?

याबाबत आम्ही तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सातारा डॉ. कैलास शिंदे यांना निवेदन दिले होते. नंतर २०१९ साली करवडी गावात १ लाख १३ हजार लिटर क्षमतेची टाकी बांधण्यासाठी रु २५ लाख रुपायच निधी मंजूर झाला. मात्र करवडी गावाचा समावेश सदाशिवगड पाणी पुरवठा योजनेत असल्याने नवीन टाकी बांधताना तांत्रिक अडचण आल्याने हे काम रखडले. दरम्यान फेब्रुवारी २०२१ मध्ये करवडी गावचे नाव सदाशिवगड पाणी पुरवठा योजनेतून वगळण्यात आले.

तेव्हा आता गेल्या ४ ते ५ वर्षात गावाची वाढलेली लोकसंख्या विचारात घेऊन गावाला २ लाख ५०००० लिटर ज्यादा क्षमतेची टाकी मंजूर करावी, व तातडीने टाकीचे काम १५ दिवसात चालू करावे. असे निवेदन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना मनोज माळी, वैभव चव्हाण, अमोल जाधव यांनी दिले आहे.

Leave a Comment