हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | Dark Circles आजकाल लोकांना डार्क सर्कलची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. आपल्या संपूर्ण त्वचेचा रंग वेगळा आणि डोळ्याखाली वेगळा रंग दिसतो. अनेकवेळा झोपेच्या कमतरतेमुळे हे डार्क सर्कल येतात, असे मानले जाते. परंतु तुम्हाला माहित आहे का की, हे डार्क सर्कल येण्यासाठी अनेक कारणं आहेत. ज्यामुळे तुमच्या डोळ्याखाली हे डार्क सर्कल येतात. आता आपण कोणत्या कारणांमुळे डार्क सर्कल येतात हे पाहणार आहोत.
डार्क सर्कल म्हणजे काय ? | Dark Circles
तुमच्या डोळ्यांखालील त्वचेचा रंग हा तुमच्या सामान्य त्वचेच्या रंगापेक्षा जास्त गडद असतो. त्यामुळे त्याला डार्क सर्कल असे म्हणतात. यामागे तुमची वेगळी जीवनशैली संबंधित अनेक कारणे असू शकतात. सहसा हे चिंतेचे कारण नसते. परंतु याला काही वैद्यकीय कारणे देखील असतात. तुमच्या त्वचेच्या रंगानुसार तुमच्या डार्क सर्कलचा रंग कसा आहे यानुसार ते ठरवले जाते.
ॲनिमिया
लोहाच्या कमतरतेमुळे शरीरातील रक्तपेशी कमी होतात. याला ॲनिमिया असे म्हणतात. यावेळी शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही. त्यामुळे डोळ्याखाली डार्क सर्कल तयार होतात.
थायरॉईड
थायराइड ग्रंथी योग्यरित्या हार्मोन सोडत नसल्यामुळे थायरॉईडची स्थिती उद्भवू शकते. त्यामुळे थायरॉईड ग्रंथी जास्त थायरॉईड संप्रेरिक सोडू लागते. किंवा आवश्यकतेपेक्षा कमी या स्थितीमुळे देखील तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल येतात.
विटामिनची कमतरता | Dark Circles
तुमच्या शरीरात विटामिन बी, व्हिटॅमिन के, विटामिन ई आणि विटामिन डीच्या कमतरतेमुळे देखील डार्क सर्कल येऊ शकतात. त्यामुळे डार्क सर्कल जर जास्त काळ राहत असतील तर डॉक्टरांची संपर्क साधा.
डीहायड्रेशन
आपल्या संपूर्ण बॉडीला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही जर गरजेपेक्षा खूप कमी पाणी पीत असाल, तरी देखील तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे येऊ शकतात त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या.
हाइपरपिगमेंटेशन
सनस्क्रीन किंवा सूर्य संरक्षणापासून सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहिल्यास हाइपरपिगमेंटेशन होऊ शकते. मेलालीन अत्याधिक उत्पादनामुळे होते. त्यामुळे तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल येऊ शकतात.
त्वचारोग
त्वचारोगामुळे देखील तुम्हाला डार्क सर्कल येतात. ही त्वचेची अशी स्थिती आहे. ज्यामध्ये त्वचा कोरडी पडते. लालसर पडते आणि जळजळ देखील होते त्यामुळे डोळ्याजवळ रक्तवाहिन्या पसरतात. आणि त्वचेच्या वर दिसू. लागतात त्यामुळे देखील डार्क सर्कल येतात.