गडचिरोली | “दारू सोडा, आरोग्य जोडा”, “दारूची बाटली फुटली पाहिजे, गावाची दारू सुटली पाहिजे” या घोषणा देत आंबटपल्ली गावात दारूच्या निषेधार्थ प्रभातफेरी काढण्यात आली. दारुबंदीच्या निर्णयाचे स्वागत करत दारू विक्रेत्यांनी एका दिवसापूर्वी उपलब्ध दारूची विल्हेवाट लावून या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘मुक्तीपथ’ या महाराष्ट्र शासन, सर्च संस्था आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने उभी राहिलेली व्यसनमुक्ती मोहीम असून या उपक्रमला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.
ट्विटर लिंक –
"दारू सोडा, आरोग्य जोडा", "दारूची बाटली फुटली पाहिजे, गावाची दारू सुटली पाहिजे" या घोषणा देत आंबटपल्ली गावात दारूच्या निषेधार्थ प्रभातफेरी काढण्यात आली. दारुबंदीच्या निर्णयाचे स्वागत करत दारू विक्रेत्यांनी एका दिवसापूर्वी दारूची विल्हेवाट लावून सकारात्मक प्रतिसाद दिला.#MVSTF pic.twitter.com/AsjCQID48E
— Village Social Transformation Foundation (@MVSTForg) September 3, 2018