दाऊद इब्राहम पाकिस्तानमध्येच; पाकिस्तानकडून अतिरेक्यांची यादी जाहीर

नवी दिल्ली | भारतासाठी मोस्ट वाँन्टेड असणारा अतिरेकी दाऊद इब्राहिम पाकिस्तान मध्येच असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानने स्वत: याबाबत खुलासा केला असून दाऊद पाकिस्तानात असल्याची कबूली पाकने दिली आहे. पाकिस्तानच्या या दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर एकच खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानने आज त्यांच्या देशात असलेल्या अतिरेक्यांची यादी जाहीर केली. या यादीत माॅस्ट वाँटेड अतिरेकी दाऊद इब्राहिम याचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय संघटनांच्या दबावामुळे पाकिस्तानने सदर यादी जाहीर केली आहे. पाकने प्रथमच दाऊद पाकिस्तानात असल्याचे मान्य केले आहे.

दरम्यान, १९९३ पासून भारत सरकार दाऊद इब्राहिमचा शोध घेत आहे. अनेकदा दाऊद सुरक्षा यंत्रणांना चकवा देऊन पसार होण्यात यशस्वी झाला आहे. मागील काही वर्षे दाऊत पाकिस्तानात आसल्याचे बोलले जात होते. आता खुद्द पाकिस्ताननेच दाऊद पाकिस्तानात असल्याचा खुलासा केला आहे.