टीम हॅलो महाराष्ट्र। कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा कराचीतच असल्याचा दावा त्याचा एकेकाळचा सहकारी गँगस्टर एजाझ लकडावालाने केला आहे. काही दिवसांपूर्वीच एजाझ लकडावालाला मुंबई क्राईम ब्रांचने पाटणाहून अटक केली. लकडावालाच्या अटकेनंतर पहिल्यांदाच चौकशी दरम्यान त्याने दाऊदबाबतची माहिती उघड केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
काराचीमधील दाऊद इब्राहिम राहत असलेल्या दोन निवासस्थानांची माहिती लकडावाला याने मुंबई पोलिसांना दिली आहे. स्वतःची टोळी निर्माण करण्यापूर्वी लकडावाला हा दाऊदसाठी काम करीत होता. खंडणीचे अनेक गुन्हे, हत्या आणि दंगल घडवल्याप्रकरणी तो मुंबई पोलिसांना हवा होता.