मुंबईच्या मधोमध दाऊद चालवत होता ड्रग्सची फॅक्टरी; आत्तापर्यंत कमावले तब्बल 1000 कोटी रुपये

मुंबई | दाऊद आणि मुंबईतील त्याचे अस्तित्व याची चर्चा नेहमी होत असते. तो आजही दुबईमध्ये राहून मुंबईमध्ये सक्रिय असल्याची शक्यता वर्तविण्यात येते. एनसीबी म्हणजेच ‘नार्कोटिक्स कंट्रोल बिरो’ यांनी इतिहासातील सर्वात मोठा छापा मुंबई मधील डोंगरी या भागातील ड्रग्स फॅक्टरीवर टाकला आहे. ती फॅक्टरी दाऊदच्या निकटवर्तीयाची असल्याचे बोलले जात आहे. यातुन दाऊदने तब्बल 1000 कोटी रुपये कमावल्याचे बोलले जात आहे.

मुंबई मधील ड्रग्स फॅक्टरी ही दाऊदचा निकटवर्तीय चिकू पठाण चालवत होता. मुंबईमधील बहुतांशी ठिकाणी ड्रेस पोहोचण्याचे काम चिकू पठाण करतो व तो मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्सचा सप्लायर असल्याचेही बोलले जाते. या छाप्यांमधून कोट्यावधींची नकद रक्कम, कोट्यावधीचा बनवून पूर्ण असलेले ड्रग्स, त्यासाठीचा कच्चामाल, मोठे हत्यारे अशा प्रकारच्या गोष्टी या छाप्यामधून बरामाद केल्या गेल्या.

सुशांत सिंग राजपूतच्या केस नंतर मुंबईतील ड्रग्स रॅकेट उघडकीस आले होते. त्यानंतर एनसीबीने मोठ्या धडाडीने कारवाई करत माफिया आणि सप्लायर यांच्यावर कारवाई करणे सुरू केले. या ड्रेस फॅक्टरी वरील छाप्यानंतर एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांनी अजून काही ठिकाणी छापा घालण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे.

You might also like