धक्कादायक ! सुनेवर चाकू हल्ला करत सासऱ्याची आत्महत्या

खेड : हॅलो महाराष्ट्र – खेड या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये ‘माझ्या घरात कशी काय राहते, तेच बघतो’ म्हणत सुनेवर चाकूने वार करणाऱ्या सासऱ्याने देखील महामार्गावर भरधाव धावणाऱ्या डंपरखाली उडी मारून आत्महत्या केली आहे. मृत सासरा आपल्या सुनेवर चाकूहल्ला केल्यानंतर दुचाकी घेऊन फरार झाला होता. यानंतर त्याने महामार्गावर भरधाव डंपरखाली उडी मारून आपले जीवन संपवले आहे. या सासऱ्याला परिसरातील लोकांनी बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला.

काय आहे प्रकरण
आत्महत्या केलेल्या सासऱ्याचे नाव पुरुषोत्तम दगडू येवले आहे तर सुनेचे नाव राधिका मोरेश्वर येवले असे आहे. हे दोघेही खेड तालुक्यातील वाकी गावातील संतोषनगर परिसरात राहतात. यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. याच वादातून सासरे पुरुषोत्तम यांनी रागाच्या भरात आपल्या सुनेवर चाकूहल्ला केला आहे. या हल्ल्यात सून गंभीर जखमी झाल्याचे पाहून सासरे दुचाकी घेऊन फरार झाले होते. यानंतर संतोषनगरमधील काही लोकांनी सून राधिका यांना तातडीने चाकण येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तर दुसरीकडे सासरे पुरुषोत्तम यांनी पुणे-नाशिक महामार्गावर एका भरधाव डंपरखाली उडी घेऊन आत्महत्या केली आहे.

या घटनेनंतर बेशुद्धावस्थेत असणाऱ्या पुरुषोत्तम यांना काहीजणांनी रुग्णालयात दाखल केले. सून आणि सासऱ्यावर चाकण येथील क्रिटीकेअर याठिकाणी उपचार सुरू होते. या ठिकाणी उपचार चालू असताना सासरे पुरुषोत्तम येवले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर सून राधिका हिच्यावर अजून उपचार सुरु आहेत. सासऱ्याने राधिका यांच्या अंगावर ठिकठिकाणी वार केले आहेत. त्यामुळे राधिका यांची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टर त्यांच्यावर अधिक उपचार करत आहेत.

You might also like