हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अखेर आयपीएल 2020 साठी सर्व संघ आणि खेळाडू सज्ज झालेले आहेत. आत्तापर्यंत आयपीएलचे एकूण 12 हंगाम झाले आणि आत्तापर्यंत आयपीएलमध्ये अनेक शतकी खेळया आपण बघितल्या आहेत. आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांची खेळी ख्रिस गेलने साकारली आहे. ख्रिस गेलने २०१३ साली आरसीबीच्या संघातून खेळताना १७५ धावांची झंझावाती खेळी साकारली होती. पण आतापर्यंत एकाही फलंदाजाला आयपीएलमध्ये द्विशतक झळकावता आलेले नाही.
त्यातच आता कोलकाता नाईट रायडर संघाचा प्रशिक्षक डेव्हिड हसी म्हणतोय की एक धडाकेबाज फलंदाज आहे जो आयपीएल मध्ये द्विशतक झळकावू शकतो ..हा खेळाडू म्हणजे आक्रमक फलंदाज आंद्रे रसेल होय.
याबाबत हसी म्हणाले की, ” कोलकात्याच्या संघात आंद्रे रसेल हा वादळी खेळी साकारणारा फलंदाज आहे. आतापर्यंत त्याने झंझावाती खेळी साकारल्या आहेत. पण तो फलंदाजीमध्ये ५-७ या क्रमांकावर फलंदाजीला येतो. त्यामुळे त्याला जास्त चेंडू खेळायला मिळत नाहीत. जर रसेल हा पहिल्या तीन फलंदाजांच्या जागी खेळायला आला तर तो आयपीएलमध्ये द्विशतकही झळकावू शकतो.”
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’