जनाब देवेंद्र फडणवीस ; रोझा-इफ्तारचं ‘ते’ पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या ‘शिवशाही कॅलेंडर २०२१’ वरील उर्दू मजकुरावरून भाजपानं शिवसेनेवर निशाणा साधताना पुन्हा एकदा शिवसेनेच्या हिंदुत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. परंतु आता सोशल मीडियावर दावत- रोझा- इफ्तारचं एक पोस्टर व्हायरल झालं आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावापुढे जनाब शब्द आहे. याशिवाय पोस्टरवर भारतीय जनता पक्षाच्या इतर अनेक नेत्यांची नावं आहेत. त्यांच्या नावांपुढेही जनाब असा उल्लेख करण्यात आला आहे.

या पोस्टरमध्ये इफ्तारची तारीख (७ जून २०१८) देण्यात आली आहे. मुंबईतील सीएसटी येथील पलटन रोड परिसरातील हज हाऊसमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे होते. त्यांच्या नावाचा उल्लेख पोस्टरवर असून त्यापुढे जनाब लिहिण्यात आलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत इतर पाहुणे म्हणून भाजप नेते शाहनवाझ हुसेन, तत्कालीन मंत्री विनोद तावडे, आमदार आशिष शेलार, खासदार पूनम महाजन, गोपाळ शेट्टी, किरीट सोमय्या यांचा उल्लेख आहे. पोस्टरवरील मजकुरासाठी हिरवा रंग वापरण्यात आला आहे. भाजप नेत्यांच्या नावांचा समावेश असलेले इफ्तारचं हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment