शरद पवारांना दाऊदने सोन्याचा हार घातला; आंबेडकरांच्या आरोपाने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून, आचारसंहितेला सुरुवात झाली आहे. त्यातच आता भर निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर एक खळबळजनक आरोप केला आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिमला दुबईत भेटले एवढच नव्हे तर त्यावेळी दाऊदने शरद पवारांना सोन्याचा हार घातला असा गंभीर आरोप करत प्रकाश आंबेडकर यांनी खळबळ उडवून दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या दाव्याचे मोठे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आंबेडकरांच्या या आरोपावर काय प्रत्युत्तर देतो ते सुद्धा बघावं लागेल.

प्रकाश आंबेडकरांनी सरकारला विचारले प्रश्न

1988-91 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते. पवारांनी या काळात लंडनचा दौरा केला होता . या दौऱ्याची कल्पना सरकारला होती का , सरकारने त्यांना मान्यता दिली होती का , कॅलिफोर्नियात पवारांनी जी बैठक घेतली त्याची माहिती तत्कालिन केंद्र सरकारला होती का तसेच शरद पवार आणि दाऊद इब्राहिमच्या भेटीची माहिती सरकारला होती का असे प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी सरकारला विचारले आहेत.

पवारांवरती जोरदार टीका

पवार लंडनचा दौरा करत असताना . ते प्रथम लंडनला गेले . त्यानंतर ते कॅलिफोर्नियाला गेले. तिथे दोन दिवस थांबले . पुन्हा ते कॅलिफोर्नियामधून लंडनमध्ये आले . लंडनमध्ये दोन दिवस राहिले . तिथून दुबईला गेले आणि दुबईमध्ये त्यांची दाऊद इब्राहीमसोबत एक बैठक झाली . त्यांना तिथे सोन्याचा हार घालण्यात आला असा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. निवडणुकीच्या काळात आंबेडकरांनी पवारांवरती जोरदार टीका केल्या आहेत . त्यांनी जनतेला मतदान करताना हा सगळा इतिहास जाणूनच मतदान करा , असे सांगितले आहे.