DCB Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, ​​आता FD वर मिळेल 8.35% व्याज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । DCB Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता DCB Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या व्याजदरात वाढ केली आहे.

DCB Bank Q2 net profit down 10% - The Hindu BusinessLine

 21 डिसेंबर 2022 पासून नवीन दर लागू

DCB Bank च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, हे नवीन दर 21 डिसेंबर 2022 पासून लागू आहेत. आता बँक 7 दिवस ते 120 महिन्यां च्या FD वर सर्वसामान्य नागरिकांना 3.75% ते 7.60% तर ज्येष्ठ नागरिकांना 4.25% ते 8.10% पर्यंत व्याजदर देत आहे. तसेच आता DCB बँक 700 दिवस ते 36 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर सर्वसामान्य नागरिकांना 7.85% तर ज्येष्ठ नागरिकांना 8.35% सर्वाधिक व्याजदर देत आहे.

DCB Bank's Q3 net profit rises by 25%; Gross NPA contracts by 43 bps | Zee  Business

DCB Bank चे नवीन एफडी दर 

आता DCB Bank कडून 7 दिवस ते 45 दिवसांच्या FD वर 3.75%, 46 दिवस ते 90 दिवसांच्या FD वर 4.00%, 91 दिवस ते सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 4.75% आणि सहा महिने ते 12 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.25% व्याज दर देण्यात आला आहे. त्याचबरोबर आता बँक 12 ते 18 महिन्यांच्या FD वर 7.25%,18 ते 700 दिवसांच्या FD वर 7.50%, 700 दिवस ते 36 महिन्यांच्या FD वर 7.85% आणि 36 महिने ते 120 महिन्यांच्या FD वर 7.60% व्याज दर देईल.

‘या’ एफडीचाही घेता येईल लाभ

स्टॅंडर्ड फिक्स्ड डिपॉझिट व्यतिरिक्त, DCB बँकेकडून आपल्या रिटेल ग्राहकांना DCB सुरक्षा फिक्स्ड डिपॉझिट, DCB टॅक्स सेव्हर फिक्स्ड डिपॉझिट, DCB डायमंड खुशियाली डिपॉझिट, DCB Zippy ऑनलाइन फिक्स्ड डिपॉझिट आणि DCB हेल्थ प्लस फिक्स्ड डिपॉझिट उघडण्याची संधी देत आहे.

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

अनेक बँकांनी FD चे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच इंडियन ओव्हरसीज बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, येस बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

RBI कडून रेपो दरात वाढ

अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. DCB Bank

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.dcbbank.com/dcb-fixed-deposits/deposit-rates

हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये