हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan Yojana : केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना चालविल्या जातात. हे लक्षात घ्या कि, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही अशाच योजनांपैकी एक आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 हप्ते पाठवण्यात आले आहेत. तसेच एका ताज्या अपडेटनुसार नवीन वर्षाची भेट म्हणून सरकार कडून लवकरच 13वा हप्ता देखील जानेवारीच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो.
मात्र, या 13 व्या हप्त्याचे पैसे देण्यापूर्वी PM Kisan Yojana मधून अनेक शेतकऱ्यांची नावे वगळली जाऊ शकतात. जमिनीच्या नोंदी आणि ई-केवायसी न केल्यामुळे अनेक शेतकरी या योजनेच्या रकमेपासून वंचित राहू शकतात. इथे हे लक्षात घ्या की, 12 व्या हप्त्यादरम्यानही अनेक शेतकऱ्यांची नावे या लिस्ट मधून वगळण्यात आली होती.
13 व्या हप्त्यापूर्वी करावे लागेल ‘हे’ काम
आता ज्या शेतकऱ्यांना 13 वा हप्त्याचे पैसे मिळवायचे आहेत, त्यांनी लवकरात लवकर PM Kisan Yojana च्या वेबसाइटवरून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तसेच जे शेतकरी असे करणार नाहीत त्यांना या योजनेची रक्कम पाठवली जाणार नाही.
लाभार्थ्यांच्या लिस्टमध्ये अशा प्रकारे तपासा आपले नाव
लाभार्थ्यांच्या लिस्टमध्ये आपले नाव आहे कि नाही हे पाहण्यासाठी PM Kisan Yojana च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन लाभार्थी लिस्ट पाहवी लागेल. यासाठी अधिकृत वेबसाईटवरील फार्मर्स कॉर्नरला भेट द्यावी लागेल. येथे बेनेफिशियरी स्टेटसवर जाऊन नाव तपासता येईल. तसेच, कोणत्याही प्रकारच्या समस्येसाठी, हेल्पलाइन क्रमांक- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधता येईल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://pmkisan.gov.in/
हे पण वाचा :
लवकरच लॉन्च होणार स्वस्त Electric Bike, एका चार्जिंगमध्ये मिळेल 135KM रेंज
BSNL मध्ये होणार मोठा बदल; सरकारने बनवलाय जबरदस्त प्लॅन
Kotak Mahindra Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, 7 दिवसांत तिसऱ्यांदा FD वरील व्याजदरात केली वाढ
Train Cancelled : रेल्वेकडून आज 261 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोने-चांदी झाले स्वस्त, आजचे दर तपासा