सातारा जिल्हा बॅंक निवडणूक : पहिल्याच दिवशी अँड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांचा अर्ज दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि; सातारच्या संचालक मंडळ सार्वत्रिक निवडणूकीसाठी कराड सोसायटी मतदारसंघातून अँड. उदयसिंह विलासराव पाटील (उंडाळकर) यांनी पहिल्याच दिवशी निवडणूक अधिकारी मनोहर माळी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

स्व.यशवंतराव चव्हाण, स्व. आबासाहेब वीर यांचे मार्गदर्शनाखाली 1967 साली कराड सोसायटी मतदारसंघातून विलासराव पाटील (काका) यांनी जिल्हा बँकेत प्रवेश केला. सलग 11 वेळा याच मतदारसंघातून काका बँकेत संचालक राहिले. बँकेचे उपाध्यक्ष, अध्यक्ष व मार्गदर्शक अशा भूमिका बजावत सातारा बँकेचा नावलौकिक देशभर वाढवला. स्व.चव्हाणसाहेब, स्व. आबासाहेब वीर यांनी घालून दिलेले आदर्श पुढे घेऊन जात बँकेच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान दिले. काका बँकेचे संचालक असतानाच ४जानेवारी २०२० रोजी त्याचे निधन झाले.

काकांच्या जागेवर त्यांचे सुपुत्र उदयसिंह पाटील यांची नियुक्ती सर्वानुमते ठरली. मात्र तोपर्यंत बँकेची निवडणूक जाहीर झालेने काकाचा वारसा राजकारण, समाजकारणा बरोबर सहकारात चालवण्यासाठी उदयसिंह पाटील यांनीच काकांचे जागेवर निवडणूक लढवावी असा आग्रह कराड तालुक्याबरोबर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील नेतेमंडळी, कार्यकर्ते यांनी धरला होता. उदयसिंह पाटील यांनी या सूचनानुसार वरिष्ठ नेतेमंडळीच्या सल्ल्याने व कराड सोसायटी मतदारसंघातील मतदाराची चर्चा करून उमेदवारी निश्चित केली होती. आज पहिल्याच दिवशी जिल्हा बँक निवडणुकीत अर्ज दाखल करत विलासकाकांचा वारसा व सेवा सोसायट्याशी असलेली बांधिलकी जोपसण्यासाठी उदयदादा सज्ज झाले आहेत.

Leave a Comment