मोठी बातमी | कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीला DCGI ची मंजुरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापराची संमती देण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेतला सर्वात मोठा टप्पा पार पडला आहे. सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. DCGI नं पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार सीरमने दिलेल्या अहवालामध्ये ही लस 70 टक्के यशस्वी झाल्याचं म्हटलं आहे. आपत्कालीन परिस्थिती मंजूर झाली, क्लिनिकल चाचणी अद्यापही चालू आहे. तर भारत बायोटेकनं तयार केलेल्या लशीचे मागच्या दोन महिन्यात कोणतेही दुष्परिणाम आढळून आले नाहीत अशी माहिती समोर आली आहे.

दोन ते आठ डिग्री सेल्सिअसमध्ये ही लस स्टोअर करावी लागणार असून या लशीचे नागरिकांना सीरम किंवा भारत बायोटेक लशीचे दोन डोस देण्यात येतील. DCGIने आपत्कालीन वापरासाठी काही सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे भारतातील या दोन लशींचा मार्ग मोकळा झाला आहे. तर भारतात 2 जानेवारीपासून 116 जिल्ह्यांमध्ये ड्राय रन देखील सुरू झालं आहे

कोव्हिशिल्ड आणि सीरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेल्या लशीला भारतात आपत्कालीनं वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ही लस 70.42 % परिणामकारक असल्याचं आतापर्यंतच्या अहवालातून समोर आलं आहे. DCGIनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment