व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला अल्पवयीन मुलगा-मुलीचा मृतदेह; घातपाताची शंका

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावती जिल्ह्यातील महादेव खोरी परिसरातील वनविभागाच्या राखीव जंगलात एका 17 वर्षीय मुलाचा आणि 16 वर्षीय मुलीचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.हे मृतदेह तीन-चार दिवसांपासून लटकलेले असावेत असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. हे दोघेजण १३ मेपासून बेपत्ता होती. या दोघांनी आत्महत्या केली की, हा घातपात आहे? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण
मयूर अमेंद्र कांबळे आणि गायत्री असे मृत मुलामुलींची नावे आहेत. हे दोघेही अमरावतीमध्ये राहत होते. या दोघांचे मृतदेह गुरुवारी दुपारी महादेव खोरी परिसरातील एका जंगलात सागाच्या झाडाला लटकावलेल्या अवस्थेत सापडले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ते मृतदेह झाडावरून खाली उतरवले. हे दोन्ही मृतदेह मागील तीन ते चार दिवसांपासून लटकलेल्या अवस्थेत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मयूर आणि गायत्री घरात न दिसल्यामुळे दोघांच्या कुटुंबीयांकडून दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्यांची तक्रार दाखल केली आहे.

गायत्रीच्या कुटुंबीयांनी 13 मे रोजी राजापेठ ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली तर तर मयूरच्या कुटुंबीयांनी 14 मे रोजी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला होता.पण गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा दिवसांनी दोघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने या दोन्ही कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. संबंधित दोघांनी आत्महत्या केली की, हा घातपात आहे? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.