Sunday, April 2, 2023

घातपात, अपघात की आणखी काही? तरंगणारं चप्पल..काठावर मोबाईल अन् तलावात मृतदेह सापडला

- Advertisement -

अमरावती प्रतिनिधी : सलमान खान

एका ३० वर्षीय युवकाचा अमरावती शहरातील वडाळीच्या तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली. सदरच्या घटनेची माहिती प्राप्त होताच पोलीस आपल्या पथकासोबत घटनास्थळी पोहोचले. त्यांना वडाळी तलावाच्या काठावर मोबाईल पडलेला दिसला. तसेच तलावावर त्याची तरंगताना चप्पल दिसली. त्यानंतर पोलिसांनी गोताखोरांची मदत घेऊन शोधकार्य सुरु केले. परंतु युवकाचा ठावठिकाणा लागला नाही. विनोद उध्दव मेश्राम असे तलावात बुडणाऱ्या युवकाच नाव आहे.

- Advertisement -

प्राप्त माहितीनुसार, विनोद मेश्राम वडाळी तलावात बुडल्याची माहिती मिळाली. तलावाच्या काठावर त्याचा मोबाईल पडलेला दिसला व तलावात त्याची चप्पल तरंगतांना आढळून आली. त्यामुळे तो तलावात बुडल्याचा संशय निर्माण झाला. विनोदच्या भावाने सदरची सूचना फ्रेजरपुरा पोलिसांत दिली. माहिती मिळताच ठाणेदार आपल्या पथकांसह घटनास्थळी पोहोचले.

सदरची घटना वाऱ्यासारखी चोहोकडे पसरली. त्यामुळे तलावाच्या काठावर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली होती. पोलिसांनी गोताखोरांची मदत घेऊन विनोदचा तपास सुरु केला. परंतु बराच वेळ होऊन सुध्दा त्याचा थांगपत्ता मिळ शकला नाही.

शेवटी पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालय स्थित असलेल्या आपातकालीन रेस्क्यू पथकाला मदतीला बोलाविले. अथक परिश्रमानंतर सदर पथकाने विनोदचे शव तलावातून शोधुन काढले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शव पोस्टमार्टम करिता जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले आहेत. पुढील तपास पोलिस करीत आहे.