Dead Butt Syndrome | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. लोक बैठेकाम करायला लागलेली आहेत. शारीरिक कष्ट कमी व्हावे त्यासाठी लोक प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे आयटीमध्ये असलेले लोक व इतर लोकही ऑफिसमध्ये बसूनच काम करतात. परंतु तुम्ही जर खूप वेळ बसून काम केले एकाच जागेवर असाल, तर यामुळे तुम्हाला काही आजार देखील होऊ शकतात. तुम्ही जर एकाच जागी 45 मिनिटांपेक्षा जास्त वेळ एकाच जागी बसून राहिला, तर ते तुमच्या शरीरासाठी अत्यंत धोकादायक असते. त्यामुळे तुमच्या शरीराला अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. त्यातीलच एक म्हणजे डेड बट सिंड्रोम (Dead Butt Syndrome) असा आहे. आता हा आजार नक्की कोणता आहे?आणि यामुळे आपल्या शरीराला कोणते धोके होऊ शकतात? हे जाणून घेऊया.
डेड बट सिंड्रोम | Dead Butt Syndrome
कोरोनाच्या काळापासून घरून काम करण्याची पद्धत वाढली आहे. त्यामुळे लोक आता एकाच ठिकाणी तासनतास बसून काम करतात, त्यांचा संपूर्ण दिवस घरच्या आणि ऑफिसच्या कामात जातो आणि त्यांना शारीरिक हालचाल करायलाही वेळ मिळत नाही. जर तुमची परिस्थिती अशीच असेल तर सावध रहा, तुम्ही लवकरच डेड बट सिंड्रोमचे बळी होऊ शकता.
डेड बट सिंड्रोम म्हणजे काय? | Dead Butt Syndrome
एकाच स्थितीत जास्त वेळ बसल्याने डेड बट सिंड्रोम होऊ शकतो. याला ग्लूटीअल ॲम्नेशिया असेही म्हणतात. यामध्ये अनेकदा नितंब बधीर होतात. हिप आणि त्याच्या सभोवतालचे भाग काही काळ काम करणे थांबवतात. त्यामुळे ग्लूटेन मेडिअस नावाचा आजारही होऊ शकतो. त्यामुळे सामान्य कामे करणेही कठीण झाले आहे. या समस्येमध्ये ग्लुटीयस मेडिअस म्हणजेच हिप बोनमध्ये सूज येते. रक्ताभिसरण थांबल्यामुळे हे घडते.
डेड बट सिंड्रोमची लक्षणे काय आहेत?
- पाठ, गुडघे आणि घोट्यात तीव्र वेदना
- हिप ताण
- नितंबांच्या खालच्या भागात म्हणजे कंबरेत मुंग्या येणे
- कूल्ह्यांभोवती सुन्नपणा, जळजळ आणि वेदना
- डेड बट सिंड्रोम टाळण्याचे मार्ग
- ऑफिसमध्ये जिने वापरा, लिफ्ट नाही.
- दर 30-45 मिनिटांनी तुमच्या सीटवरून उठत राहा आणि स्ट्रेच करत रहा.
- आडवा पाय घालून बसणे फायदेशीर ठरू शकते.
- रोज किमान 30 मिनिटे चाला.