हॅलो महाराष्ट्र | आजकाल जेवणामध्ये भेसळ होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. परंतु जेवणामध्ये वेगवेगळे गोष्टी देखील सापडत आहेत. अशातच आता बिहारमधून एक घटना समोर आलेली आहे. ती म्हणजे बिहारच्या बांका जिल्ह्यातील एका सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात दहा विद्यार्थ्यांना मागील आठवड्यात मेसच्या टेबलमध्ये मृत साप आढळला. त्यांनतर त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्या विद्यार्थ्यांना रात्री जेवणातून विषबाधा झाल्याची तक्रार होती. आता सर्वजण ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितलेले.
या घटनेमुळे त्यांच्या वस्तीगृह संतापाची लाट उसळली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी असे सांगितलेले आहे की, या घटनेचा जेव्हा त्यांनी निषेध केला, तेव्हा महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी त्यांना धमकवलेले आहेत.
या घटनेवर सनी या विद्यार्थ्याने सांगितले की, “आम्हाला मेस मधील खाद्यपदार्थ संदर्भात समस्या येत आहेत. मात्र यावेळी त्यांनी मर्यादा ओलांडले आहेत. अन्नात साप आढळून आला आहे. हे कुणी सहन करू शकत नाही. जेव्हा जेव्हा आम्ही हा मुद्दा प्राध्यापकांसमोर मांडला तेव्हा त्यांनी तो दाबण्याचा प्रयत्न केला.”
आयुषी नावाच्या विद्यार्थिनीने सांगितले की, जेवणाच्या गुणवत्तेचा मुद्दाही मुलींच्या मेसशी संबंधित आहे. आयुषी म्हणाली, “एसडीएम सर खूप आधी तपासणीसाठी आले होते आणि ९० टक्के जेवण संपले होते. आणि नियमही असे आहेत की जर एखाद्याला हॉस्टेलमध्ये राहायचे असेल तर त्याला मेसचेच जेवण खावे लागेल. जर तिथे मेस फूड नाही जर त्याने जेवण खाल्ले किंवा मेसचे पैसे दिले नाहीत तर त्याला परीक्षेला बसू दिले जात नाही.”
जिल्हा प्रशासनाने ताज्या घटनेचा तपास सुरू केला आहे. याआधीही कॉलेजमध्ये जेवणाबाबत तक्रारी आल्या होत्या. लाइव्ह हिंदुस्तानने जिल्हा दंडाधिकारी अंशुल कुमारच्या हवाल्याने सांगितले की, प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून कॉलेजला सूचना दिल्या आहेत. असा प्रकार पुन्हा घडल्यास दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
उपविभागीय अधिकारी (एसडीओ) अविनाश कुमार आणि पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) विनोद कुमार यांनी शुक्रवारी संध्याकाळी महाविद्यालयाला भेट दिली आणि विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले.