आरटीई प्रवेशासाठी पुन्हा 31 जुलैपर्यंत मुदत वाढ

औरंगाबाद |   आरटी प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू असून 2021- 22 या शैक्षणिक वर्षासाठी च्या प्रवेशाच्या पहिल्या फेरीत 2 हजार 382 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहे. तसेच तांत्रिक अडचणीमुळे ज्या पालकांना प्रवेश घेता आले नाही त्यामुळे 31 जुलैपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.

आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क कायदा करण्यात आला आहे. या कायद्यानंतर खाजगी शाळांमध्ये 25 टक्के जागांवर मोफत प्रवेश देण्यात येतो. या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येते गेल्या वर्षीपासून कोरोना वाढता प्रादुर्भावामुळे प्रवेशाचा लकी ड्रॉ देखील ऑनलाईन काढण्यात आला होता.

औरंगाबाद जिल्ह्यातील यंदा या प्रवेश प्रक्रियेसाठी एकूण 603 शाळा पात्र आहेत. एकूण प्रवेश क्षमता 3 हजार 625 आहे ऑनलाईन काढलेल्या सोडत मध्ये प्रवेशासाठी 3 हजार 470 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. कोरोनामुळे पालकांना येत असलेल्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता आत्तापर्यंत प्रवेशासाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे शुक्रवारी प्रवेशासाठी पालकांची अंतिम मुदत देण्यात आले होते ते शनिवार पर्यंत एकूण 2 हजार 311 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहे तर 1 हजार 382 पालकांनी तात्पुरता प्रवेश घेतलेले आहेत.

You might also like