भारतातील ‘या’ 4 राज्यांत पसरला कोरोनाचा प्राणघातक डेल्टा प्लस व्हेरिएंट, आतापर्यंत 40 प्रकरणे नोंदली गेली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात कोरोनाव्हायरस संसर्गाची प्रकरणे झपाट्याने कमी होत आहेत तर दुसरीकडे कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट (Corona Delta Plus Variant) चिंता वाढवत आहे. या प्राणघातक व्हेरिएंटच्या घटनांमध्ये आता वाढ झाली आहे. सरकारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार कोरोनाचा हा धोकादायक व्हेरिएंट आता 4 राज्यात पसरला आहे. या 4 राज्यात आतापर्यंत एकूण 40 घटनांची नोंद झाली आहे. ही राज्ये तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आहेत. हा व्हेरिएंट सतत चिंतेचा विषय बनत चालला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

यापूर्वी मंगळवारी सरकारने माहिती दिली होती की, भारतात डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या कोरोना विषाणूची 22 प्रकरणे सापडली आहेत. त्यापैकी 16 प्रकरणे महाराष्ट्रातील आहेत. इतर प्रकरणे मध्य प्रदेश आणि केरळमध्ये नोंदली गेली आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले होते की,” आतापर्यंत ज्या दहा देशांमध्ये डेल्टा प्लस फॉर्म सापडला आहे त्यापैकी भारत एक आहे.” ते म्हणाले की,” 80 देशांत ‘डेल्टा फॉर्म’ सापडला आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”भारतीय सार्स-सीओव्ही -2 जेनोमिक्स कन्सोर्टियम (INSACOG) ने अहवाल दिला आहे की, डेल्टा प्लस व्हेरिएंट सध्या चिंताजनक आहे (VOC). ज्याचा वेगवान प्रसार, फुफ्फुसांच्या पेशीच्या रिसेप्टरला मजबूतपणे चिटकणे आणि ‘मोनोक्लोनल अँटीबॉडी’ प्रतिसादामध्ये संभाव्य कपात यासारखी वैशिष्ट्ये दिसून येत आहेत.

भारता व्यतिरिक्त कोरोना विषाणूचा ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंट अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन आणि रशियामध्ये आढळून आला आहे. ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटची प्रकरणे महाराष्ट्रातील रत्नागिरी, जळगाव, केरळ आणि मध्य प्रदेशात सापडली आहेत.

भूषण पुढे म्हणाले कि,”आरोग्य मंत्रालयाने सार्वजनिक स्वास्थ्य प्रतिसादाबद्दल एक सल्लागार जारी केला आहे ज्यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळ यांनी या विषयावर पुढाकार घ्यावा, असे म्हंटले गेले आहे.” आकडेवारीच्या बाबतीत हे आत्ता फारच लहान दिसत आहे आणि ते वाढू नये अशी आमची इच्छा आहे.” भूषण म्हणाले होते की,” कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही भारतीय लस मोठ्या प्रमाणात डेल्टा व्हेरिएंट विरूद्ध प्रभावी आहेत, त्या कीती आणि कोणत्या प्रमाणात अँटीबॉडीज तयार करतात हे लवकरच शेअर केले जाईल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment