Sunday, May 28, 2023

नराधमांचा मूकबधीर मुलीवर गँगरेप; बेशुद्धावस्थेत रस्त्यावर फेकले आणि….

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानच्या अलवरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नराधमांनी मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला आहे. बलात्कार केल्यानंतर ह्या आरोपींनी मुलीला बेशुद्धावस्थेत रस्त्यावर फेकून त्या ठिकाणाहून पळ काढला आहे. यानंतर स्थनिक लोकांनी या मुलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. मुलीच्या गुप्तांगातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. हि पीडित मुलगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

या नराधम आरोपींना लवकरात लवकर अटक करू अशी ग्वाही पोलिसांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी नन्नू मल पहाडिया आणि अलवरचे एसपी तेजस्विनी गौतम यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी मुलीची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला जयपूरला पाठवले आहे. या मुलीच्या गुप्तांगाला धारदार वस्तूने दुखापत झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. हि मुलगी फक्त आई आणि बाबा एवढेच बोलत आहे. यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी 5 टीम तयार केल्या आहेत.

पीडितेच्या काकांच्या वतीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी रात्रीपासूनच आरोपींचा शोध सुरू केला आहे. मात्र, अद्यापपर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही. हि मुलगी जेव्हापासून बेपत्ता झाली तेव्हापासून तिचा शोध सुरु होता मात्र तिचा कुठेच पत्ता लागत नव्हता. देशात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्कारावरही कडक कायदा करण्यात आला असतानादेखील मुलींवरील बलात्काराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीत. या घटनेतील पीडित मुलगी सध्या मृत्यूशी झुंज देत आहे.