प्रिय शिवसेना, वीर सावरकरजींचा हा अपमान तुम्हाला मान्य आहे का? – विजया रहाटकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

राजस्थान कॉंग्रेस सरकारने वीर सावरकर यांच्या नावापुढे ‘वीर’ लावण्यास केली मनाई

मुंबई प्रतिनिधी । राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहेलोत यांनी राज्यातील सत्ता हाती घेतल्यापासून पाठयपुस्तकांमध्ये व शिक्षण क्षेत्रात अनेक बदल केले आहे. आता नवीन केलेला बदल म्हणजे बारावीच्या पुस्तकामधून विनायक सावरकर यांच्या नावापुढील ‘वीर’ असा उल्लेख नको म्हणून नवे संशोधन केले आहे.

यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी राज्यात काँग्रेस सोबत आघाडीचे प्रयन्त करणाऱ्या शिवसेनेवर टीका केली आहे. ”प्रिय शिवसेना, राजस्थानातील कॉंगी शासनाने केलेल्या वीर सावरकर जीचा हा अपमान तुम्हाला मान्य आहे का? स्वातंत्र्यलढ्यात वीर सावरकरजी यांच्या निर्भय क्रांतिकारक योगदानाबद्दल आणि त्यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी करण्याबद्दल अजूनही तुम्ही ठाम आहात का?”. वीर सावरकर यांना भारतरत्न मिळावा म्हणून शिवसेना नेहमी आग्रही राहिली आहे , मात्र आपण आपल्या मतावर ठाम आहेत का असा सवाल रहाटकर यांनी शिवसेनाला विचारला आहे.

Leave a Comment