‘या’ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ; मोदी सरकारचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) आपल्या मतदारांना खुश ठेवण्यासाठी मोदी सरकार विविध घोषणा करत आहे. आता केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Dearness Allowance) चार टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्के होता. परंतु आता केंद्र सरकारने महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवल्यामुळे हा भत्ता 50 टक्के एवढा झाला आहे. नवीन वाढवण्यात आलेल्या भत्ता जानेवारी 2024 पासून लागू असणार आहे.

मोदी सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र या महागाई भत्त्याचा रोखलाभ कर्मचाऱ्यांना मार्च 2024 च्या वेतनापासून मिळणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे वेतन दिले जात असताना त्यामध्ये वाढीव महागाई भत्ता आणि थकबाकी भत्ता दिला जाणार आहे. एप्रिल महिन्याच्या पगारात कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याचा थकबाकी महागाई भत्ता दिला जाईल. यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात एक चांगली रक्कम पडेल.

महागाई भत्ता कोणाचा वाढला आहे?

दरम्यान, केंद्र सरकारने सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळामध्ये महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु या महागाई भत्ताचा लाभ सर्वच केंद्रीय कर्मचाऱ्यांना घेता येणार नाही. कारण सरकारने फक्त संवर्गातील अखिल भारतीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचा (All India Service Employees) महागाई भत्ता 50% केला आहे. म्हणजेच अखिल भारतीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा देखील महागाई भत्ता वाढवला जाईल अशी आशा व्यक्त केली जात होती. त्यानुसार सरकारने अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढवला आहे.