औरंगाबाद | ऐतिहासिक सलीम अली सरोवरातील हजारो मासे रविवारी मृत्यूमुखी पडले. सोमवारी महापालिका अधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सरोवराची पाहणी केली. मृत माशांचे नमुने विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाला पाठवले आहेत, तर पाण्याच्या नमुन्यांची तपासणी प्रदूषण नियंत्रण मंडळ करीत आहे.
सोमवारी सकाळीच महापालिकेचे मुख्य पशूसंवर्धन अधिकारी बी.एस. नाईकवाडे, उपअभियंता अशोक पद्मे, चांडक यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तलावाची पाहणी केली. डॉ. नाईकवाडे यांनी सांगितले की, मृत माशांचे नमुने विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाला पाठविण्यात आले आहेत. या तपासणीत माशांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पषट होईल. याचवेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनीही पाण्याचे नमुने घेतले.
म्त मासे केले नष्ट – मासे कशामुळे मेले, याचा शोध घेतला जात असतानाच मृत मासे तलावातून बाहेर काढण्यात आले. या माशांची विल्हेवाट लावण्याच्या सूचना करण्यात आल्याचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group