महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय !; दरेकरांची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईजवळील विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली. यानंतर सर्व स्थरातून या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे. अशात या घटनेबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली.

दरेकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे कि, ‘महाविकास आघाडीचं सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय. महाराष्ट्रातील रुग्णालय आग प्रतिबंधक सुरक्षा व्यवस्था रामभरोसे आहे. भंडारा,भांडूप,नागपूर आणि आता विरार कोविड रुग्णालयांना आगी लागल्या, नाशिकला ऑक्सिजन गळती झाली. कोरोनापेक्षा “सरकारी मुर्दाडपणामुळे” अनेक निष्पापांना जीव गमवावा लागला. राज्य सरकार आता तरी जागे व्हा !’

विरार येथील घटनेबाबत आज प्रवीण दरेकरांनी माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली. दरेकर म्हणाले, विरारच्या हि घटना अत्यंत वेदनादायी अशी आहे. चुका आम्ही समजू शकतो. कारण यंत्रणेवरील हा ताण आहे. व्यवस्थेत कमतरता आहे. हा व्यवस्थेतला पूर्णपणे निष्काळजीपणा आहे. यापूर्वीही अनेक घटना घडल्या. एवढं सगळं होऊनही जर आपण जागे होणार नसु, आपण गप्प बसणार असू तर कशाला सताधारी म्हणून खुर्च्या उपभोगतायत अजून किती बळी घेणार आहात.

सरकारला जनाची नाहीतर मनाची लाज असेल तर सरकारने त्याठिकाणावरून पाय उत्तर व्हावं. काल पंचविस बळी गेले. आज तेरा बळी गेले. त्याठिकाणी एक निष्काळजीपणा, व्यवस्थेतला हा दोष आहे. हे सरकार ढिम्म आहे. तुम्ही फायर ऑडिट करणार, चौकशी करणार असं सांगता आहात. आता कारवाया, फायर ऑडिट करून काय उपयोग? असा सवालही यावेळी दरेकरांनी राज्य शासनाला विचारला.

विरार येथील घडलेला घटनेनंतर त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पाहणी केली. तसेच तेथील घटनेची माहिती घेतली. नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची घटना ताजी असतानाचं विरारमध्ये व्यवस्थेतील निष्काळजीपणा दिसून आला. याला संपूर्णपणे राज्य सरकार जबाबदार आहे, अशी दरेकर म्हणाले.

Leave a Comment