कराड | कृष्णाकाठचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या पत्नी आणि कृष्णा उद्योग समूहाच्या आधारवड श्रीमती जयमाला जयवंतराव भोसले यांचे सोमवार दि. 1 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 11.30 वाजता वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
जयमाला भोसले यांचे पार्थिव मंगळवारी दि. 2 रोजी आज सकाळी 10 ते 11.30 या वेळेत कृष्णा हॉस्पिटलमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार असून, दुपारी ठीक 12 वाजता कोयना वसाहतीतील केसीटी कृष्णा स्कुलच्या पटांगणावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
कृष्णा सहकारी साखर कारखान्यांचे चेअरमन डाॅ. सुरेश भोसले यांच्या त्या मातोश्री होत. तर भाजपचे नेते डाॅ. अतुल भोसले यांच्या त्या आजी होत. त्याच्या निधनाने कृष्णा उद्योग समुहावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या अंत्यदर्शनासाठी कराड तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील लोकांनी गर्दी केली होती.