डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; हेडगेवार हॉस्पिटल येथील घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : डॉक्टर्सच्या आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे माझ्या पतीचा मृत्यू झाला, यांच्यामुळे माझ्या पतीचा जीव गेला यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी रुग्णाच्या पत्नी दिव्या प्रकाश रोकले यांनी केली आहे.

प्रकाश रोकले असे दिव्या यांच्या पतीचे नाव आहे ते शिवनेरी कॉलोनीत राहत होते त्यांना बसण्याच्या ठिकाणी पुरळ झालेली होती, त्यांचा त्रास वाढल्याने त्यांना २८ जून रोजी हेडगेवार रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या पोटाची सोनोग्राफी केली आणि तपासल्यानंतर ऑपरेशनसाठी ८०-९० हजार रुपयांचा खर्च सांगितला. कितीही खर्च लागू द्या, पण माझ्या पातीला वाचवा, असे त्यांच्या पत्नीने डॉक्टरांना सांगितले. डॉक्टरांनी उद्या ऑपरेशन करू, असे सांगून डॉक्टर निघून गेले परंतु दुसऱ्या दिवशीही ऑपरेशनसाठी नेले नाही.

ऑपरेशनमुळे त्यांना काहीही खायला प्यायला दिले नव्हते, त्यांना अस्थमाचा त्रास असल्याने त्यांना ऑक्सिजन लावला होता, पण सिलेंडर मध्ये कमी ऑक्सिजन असल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. ऑक्सिजन वाढवा अशी विनंती त्यांनी कर्मचाऱ्यांकडे केली असता, दुसरा सिलेंडर रिकामा असल्याचे त्यांनी सांगितले. हे ऐकूण त्यांना धक्का बसला दुसरा सिलेंडरची त्या मागणी करत होत्या त्यांचे कुणीही ऐकत नव्हते. त्यांनी सांगितले की माझ्या डोळ्यांदेखत माझ्या पतीचे प्राण गेले. त्यानंतर डॉक्टरांनी व कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू झाली. जवाहरनगर पोलीस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार दाखल केली आहे.

Leave a Comment