लग्नादिवशी वधूच्या मामाचा कोरोनाने मृत्यू, नवविवाहितेचा रिपोर्ट पोझिटीव्ह आल्याने संपुर्ण वर्‍हाड क्वारंटाइन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ढेबेवाडी प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात ग्रामिण भागात कोरोनाचा प्रसार झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशात आता ७ जुलै रोजी विवाह झालेल्या पाटण तालुक्यातील साईकडे येथील नवविवाहितेचा कोरोना रिपोर्ट पोझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. लग्नाच्या दिवशी वधुच्या मामाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने आता संपर्ण वर्‍हाड क्वारंटाइन करण्याची वेळ आली आहे.

या घटनेमुळे लग्न सोहळ्यास उपस्थित राहिलेल्या करवल्या व वर्‍हाडींची झोप उडाली आहे. बाधिताच्या निकट सहवासितांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया आरोग्य व पोलिस यंत्रणेने सुरू केली आहे. बारा जणांना तळमावले येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. 35 जणांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. साईकडे येथे मंगळवार 7 जुलै रोजी लग्न सोहळा पार पडला. साईकडे येथील नवरदेव आणि जावली तालुक्यातील पुनवडे येथील वधू यांचा विवाह झाला.

लग्ना दिवशीच वधूच्या मामाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. मामाच्या संपर्कात असणारे वधूच्या माहेरातील नातेवाईकांना लग्नाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच 8 जुलै रोजी त्यांच्या गावी क्वारंटाईन करण्यात आले होते. त्याच दिवशी साईकडे येथील नवरदेव व नववधूला तळमावले येथील विलगिकरण कक्षात क्वारंटाईन करण्यात आले होते. दि. 9 रोजी वधूच्या माहेरातील सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामध्ये वधूची आई, वडील, चुलता, चुलती व इतर दोन नातेवाईकांचा समावेश आहे. यांच्या निकट सहवासात असणार्‍या नववधूचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे.Sat

यामुळे वर्‍हाडी मंडळींची चिंता वाढली आहे. त्यापुर्वी नवरदेव आणि नववधूला क्वारंटाईन केल्याची माहिती समजल्यामुळे लग्नाला उपस्थित असणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. आरोग्य विभाग आणि ढेबेवाडी पोलिसांनी खबरदारी म्हणून शुक्रवारी घरातील आठ सदस्यांना तळमावलेतील विलगिकरण कक्षात क्वारंटाईन केले होते. तसेच शनिवारी नववधूचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर गावातील निकट सहवासात असणारे आणि इतर नातेवाईक व लग्न लावणारे स्वामी यांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

यामध्ये कुंभारगाव, ढेबेवाडी, शिद्रुकवाडी (गुढे) येथील नागरिकांचा समावेश आहे. लग्नामध्ये शिद्रुकवाडी (गुढे) येथील मुलाचा मामा उपस्थित असल्याचे समजताच प्रशासनाने शिद्रुकवाडी गावामध्ये धाव घेतली. मात्र ते कुटुंब मुंबईला गेल्याचे समजले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment