एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी; दाऊद- छोटा शकील गँगकडून 4 वेळा फोन

Eknath Khadase
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातील लोकसभा निवडणुका (Loksabha Elections) अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे सर्वच पक्षांच्या कामाचा जोर वाढला आहे. परंतु अशा काळातच राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकनाथ खडसे यांना ही धमकी 4 वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे याप्रकरणी खडसे यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.

दाऊद छोटा शकील गँगकडून धमकी

समोर आलेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांना जिवे मारण्याची धमकी ही दाऊद छोटा शकील गँगकडून (Dawood- Chota Shakeel Gang) देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या धमकी प्रकरणानंतर खडसे यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तसेच आपल्याला 4 वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची माहिती खडसे यांनी पोलिसांना दिली आहे.

महत्वाचे म्हणजे, घडलेल्या घटनेबाबत माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मला वेगवेगळ्या चार मोबाईल नंबर वरून जिभे मारण्याची धमकी देण्यात आली. पहिल्या नंबर वरून सांगण्यात आले की, “दाऊद छोटा शकील गँग तुम्हाला मारणार आहे, हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.” त्यानंतर दुसऱ्यांदा फोन आल्यानंतर फोनवरील व्यक्तीने म्हणले की, “आम्ही तुम्हाला सांगितले असताना ही तुम्ही अजूनही कोणती पावले उचलली नाहीत” त्यानंतरच मी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली की, त्यांना हा फोन चार ते पाच वेळा येऊन गेला. यातील एक फोन अमेरिकेवरून आला होता, तर एक लखनऊ येथून आला होता. त्यामुळेच या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत एकनाथ खडसे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आता पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहे. दरम्यान, यापूर्वी देखील एकनाथ खडसे यांना धमकीचे फोन आले होते. आता खडसे यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे राजकिय वर्तुळात ही चर्चांना उधाण आले आहे.