सातारा जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण चिंताजनक ः नवे 881 पाॅझिटीव्ह, 43 बाधितांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 881 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 924 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

काल आलेल्या रिपोर्टमध्ये बांधितांची संख्या कमी ही केवळ टेस्टींग कमी झाल्याने आलेली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी मृत्यूचा कमी आलेला आकडाही शनिवारी वाढलेला आहे. शनिवारी 43 बांधितांचा मृत्यू झाल आहे. मृत्यूचे प्रमाण चिंताजनक बनलेले आहे.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 23 हजार 136 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 37 हजार 549 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 11  हजार 207 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 3185 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर शनिवारी दिवसभरात 43 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? http://bit.ly/3t7Alba

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment